कोलंबो। श्रीलंकेत चालू असलेल्या निदाहास ट्रॉफी स्पर्धेतील दुसऱ्या सामन्यात भारताने श्रीलंकेवर ६ विकेट्सने विजय मिळवला आहे.
या सामन्यात शिखर धवनने पुन्हा एकदा अर्धशतक करून भारताच्या विजयात महत्वाची कामगिरी बजावली. त्याचबरोबर भारताकडून जयदेव उनाडकटने ३८ धावा देत ३ विकेट्स घेऊन बांगलादेशला १३९ धावात रोखण्यात मोलाची कामगिरी बजावली.
उनाडकटला या सामन्यात चांगली साथ दिली ती कारकिर्दीतील दुसराच सामना खेळत असलेल्या विजय शंकर या खेळाडूने. त्यालाच या सामन्यात सामनावीराचा पुरस्कार देण्यात आला.
परंतु जेव्हा सामनावीराचा पुरस्कार घोषीत झाला तेव्हा अनेक चर्चांना उधाण आले. हा पुरस्कार खरच त्याला द्यायया हवा होता की जयदेव उनाडकट किंवा जयदेव उनाडकट याचे खरे हकदार होते?
ही आहे तिघांची या सामन्यातील कामगिरी-
शिखर धवन- ४३ चेंडूत ५५ धावा, ५ चौकार आणि २ षटकार
जयदेव उनाडकट– ४ षटकांत ३८ धावा देत ३ विकेट्स
विजय शंकर- ४ षटकांत ३२ धावा देत २ विकेट्स
विशेष म्हणजे जयदेव उनाडकटने ज्या तीन खेळाडूंना बाद केले त्या तीनही खेळाडूंना त्याने मोठी धावसंख्या उभारण्यापासून रोखले.
दुसऱ्या बाजूला शिखर धवनने पडझड होत असताना एका बाजूने भक्कमपणे किल्ला लढवला. संघाला केवळ १७ धावांची गरज असताना तो बाद झाला.
त्यामुळे चाहत्यांनी सामनावीर पुरस्कार देण्यावर सोशल मिडीयावर नाराजगी व्यक्त केली.
@ESPNcricinfo headlines says "Unadkat and Dhawan brush aside Bangladesh" and Vijay Shankar takes away man of the match… Who is wrong🤔?? #INDvsBAN #NidahasTrophy
— Durga Sai Prasad (@Durga_S_Prasad) March 8, 2018
Vijay Shankar man of the match
Q bane unadkat Q nahi@vikrantgupta73 @cricketaakash— Shivcharan (@Shivcha83677524) March 9, 2018