सिडनी। ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारत संघात सिडनी क्रिकेट ग्राऊंडवर सुरु असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यादरम्यान भारताचा अष्टपैलू क्रिकेटपटू रविंद्र जडेजा आणि ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेजलवूड हे मस्तीच्या मुडमध्ये दिसून आले. हे दोघे सामन्यादरम्यान एकमेकांकडे मजेने नजर रोखून पाहत होते. याबाबत बऱ्याच प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या आहेत.
झाले असे की भारतीय संघाची पहिल्या डावात फलंदाजी सुरु असताना ८८ वे षटक जोश हेडलवूड टाकत होता. या षटकातील चौथ्या चेंडूवर रिषभ पंत ३६ धावांवर बाद झाला. त्यानंतर रविंद्र जडेजा फलंदाजीसाठी आला. त्याने या षटकातील पाचव्या चेंडूवर एकही धाव घेतली नाही. त्यावेळी जडेजा आणि हेजलवूड एकमेकांकडे नजर रोखून पाहाताना दिसले. त्यानंतर दोघेही एकमेकांकडे पाहून हसले आणि जडेजा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाला तर हेजलवूड षटकातील शेवटचा चेंडू टाकण्यासाठी तयार झाला.
जडेजा आणि हेजलवूडच्या या गमतीशीर चकमकीबाबत चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया आल्या आहेत.
Who will blink first? 👁#AUSvIND pic.twitter.com/o0KHONOqyy
— cricket.com.au (@cricketcomau) January 9, 2021
YOU BLINK YOU LOSE‼️ Who ya got to blink first?
`📺 Watch Day 3 #AUSvIND on Fox Cricket or Kayo: https://t.co/MP0mCNrBCY
📝Live blog: https://t.co/luaf7x0RuL
📱Match Centre: https://t.co/pv4UyqqI56 pic.twitter.com/rISRzLkxI3
— Fox Cricket (@FoxCricket) January 9, 2021
https://twitter.com/DrMJHASSAN1/status/1347742525822418947
Difficult to find hazlewood's eyes😂 in this pic.
— Ankur Sharma (@ankurs14tweets) January 9, 2021
— Tim Lowell🟡 (@timlowell) January 9, 2021
https://twitter.com/SriramKuppuswa1/status/1347754233932767232
https://twitter.com/nightcall_vibe/status/1347755832201474048
Csk love💛
— Benny (@cricforlife) January 9, 2021
Missing IPL guys 😂😂😂 https://t.co/E9itFQqgJF
— Shalakaaaaa (@Cricketwaali) January 9, 2021
चेन्नई सुपर किंग्ज संघातील संघसहकारी –
खरंतर जडेजा आणि हेजलवूड एकमेकांना चांगले ओळखतात. त्यांनी या मालिकेआधी काही महिन्यांपूर्वीच युएईमध्ये आयपीएलचा १३ वा मोसम एकत्र खेळला. ते दोघेही चेन्नई सुपर किंग्ज संघाचे सदस्य आहेत. त्यामुळे चेन्नई संघातील या दोन संघसहकाऱ्यांची मैत्री कसोटी सामन्यादरम्यान प्रतिस्पर्धी असले तरी दिसून आली आहे.
जडेजा दुखापतग्रस्त –
जडेजाने या डावात नाबाद २८ धावा केल्या. मात्र या दरम्यान मिशेल स्टार्कचा एक बाऊंसर त्याच्या डाव्या हाताच्या अंगठ्याला लागल्याने तो दुखापतग्रस्त झाला. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्या डावात गोलंदाजीसाठी उतरला नाही. बीसीसीआयने माहिती दिली आहे की त्याला स्कॅनसाठी हॉस्पिटलमध्ये घेऊन जाण्यात आले आहे. त्यामुळे आता जडेजाची दुखापत किती गंभीर आहे, हे पहावे लागणार आहे.
हेजलवूड चमकला –
हेजलवूडसाठी मात्र हा सामना खास ठरला आहे. या सामन्यादरम्यान त्याने आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील ३०० विकेट्स पूर्ण केल्या आहेत. त्याने भारताच्या पहिल्या डावात २ विकेट्स घेतल्या. त्याने रोहित शर्मा आणि रिषभ पंतला बाद केले. तसेच त्याने हनुमा विहारीला शानदार थ्रो करत धावबाद केले.
या सामन्यात ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात ३३८ धावा केल्या. तर भारताचा पहिला डाव २४४ धावांवर संपुष्टात आला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने ९४ धावांची आघाडी घेतली. तिसऱ्या दिवसाखेर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २९ षटकांत २ बाद १०३ धावा केल्या आहेत. तसेच ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या दिवसाखेरपर्यंत १९७ धावांची आघाडी वाढवली आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
खरं की काय? रिषभ पंतने ‘या’ रेकाॅर्डमध्ये सर विवियन रिचर्ड्स यांनाही मागे टाकलंय; वाचा पराक्रम
कॉमेंट्री करतेवेळी शेन वॉर्नने दिली मार्नस लॅब्यूशानेला शिवी अन् पुढे घडलं असं काही
लायसन्स तर नाय पण गाडी भारी चालवतंय! चिमुकल्याचा ‘हा’ व्हिडिओ सोशलवर हीट