भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या (BCCI) वार्षिक नमन पुरस्कारांचे आयोजन काल (1 फेब्रुवारी) रोजी मुंबईत करण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात सचिन तेंडुलकरला जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. याशिवाय, रविचंद्रन अश्विन, स्मृती मानधना आणि जसप्रीत बुमराह यांना त्यांच्या दमदार कामगिरीसाठी पुरस्कार मिळाले. याशिवाय, भारतीय संघाचा माजी महान फिरकी गोलंदाज रविचंद्रन अश्विनला बीसीसीआयने विशेष पुरस्कार दिला तर सरफराज खानलाही बीसीसीआयने सन्मानित केले.
या खास प्रसंगी भारतीय क्रिकेट संघाचे जवळजवळ सर्व सदस्य उपस्थित होते. ज्यात टीम इंडियाचा एकदिवसीय आणि कसोटी कर्णधार रोहित शर्मा आणि टी20 कर्णधार सूर्यकुमार यादव यांचा समावेश होता. मात्र, भारतीय संघाचा अनुभवी खेळाडू विराट कोहली पुरस्कार सोहळ्याला उपस्थित राहिला नाही. या पुरस्कारात विराट कोहलीला न पाहिल्याने सर्वांनाच आश्चर्य वाटले आहे. पण यामागे एक खास कारण आहे. वास्तिवक, विराट कोहली रणजी ट्रॉफीमध्ये दिल्ली क्रिकेट संघाकडून खेळण्यात व्यस्त होता. दिल्लीचा शेवटचा गट सामना अरुण जेटली क्रिकेट स्टेडियमवर रेल्वेविरुद्ध होता आणि तो काल शनिवार 1 फेब्रुवारी रोजी सायंकाळी संपला. याच कारणामुळे विराट कोहली या पुरस्कार सोहळ्याला पोहोचू शकला नाही.
बीसीसीआयने दिलेल्या वार्षिक नमन पुरस्कार सोहळ्याला भारतीय टी20 संघाचे सर्व खेळाडू यउपस्थित होते. वास्तविक, भारतीय संघाचा इंग्लंडविरुद्धचा शेवटचा आणि पाचवा टी20 सामना मुंबईतील वानखेडे क्रिकेट स्टेडियमवर खेळला जाणार आहे. या कारणास्तव, संघाचा कर्णधार सूर्यकुमार यादव, अक्षर पटेल आणि हार्दिक पांड्या यांच्यासह स्टार खेळाडूंनी येथे आपली उपस्थिती नोंदवली.
महिला क्रिकेटपटूंमध्ये स्मृती मानधनाला बीसीसीआयने सन्मानित केले. भारतीय महिला संघाची अष्टपैलू खेळाडू दीप्ती शर्माला एकदिवसीय क्रिकेटमधील तिच्या दमदार कामगिरीसाठी पदक देण्यात आले. या पुरस्कार सोहळ्यात स्मृती मानधना आणि दीप्ती यांच्याव्यतिरिक्त जेमिमा रॉड्रिग्ज देखील उपस्थित होती.
हेही वाचा-
WPL 2025: स्पर्धेपूर्वीच या संघाला मोठा धक्का, दुखापतीमुळे कर्णधाराची माघारी
IND vs ENG: मुंबई टी20 सामन्यासाठी वानखेडे स्टेडियम सज्ज! सामन्यापूर्वी पाहा पिच रिपोर्ट
IND vs ENG; पाचव्या टी20 साठी या खेळाडूची एंट्री निश्चित, पाहा टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग 11