भारत विरुद्ध न्यूझीलंड चॅम्पियन्स ट्रॉफी 2025 स्पर्धेतील अंतिम सामना आज दुबईच्या इंटरनॅशनल क्रिकेट स्टेडियम वरती खेळवला जाणार आहे. तत्पूर्वी भारतीय संघाचा उपकर्णधार शुबमन गिल म्हणाला, इमानदारीने सांगायचे झाल्यास मी या गोष्टीचा विचार करत नाही की मला रिस्क घेण्याची गरज आहे. मी माझ्या प्रमाणे परिस्थितीनुसार रिस्क घेतो तसेच कोणताही असा शॉट खेळत नाही जो आधीपासूनच ठरलेला असेल. मी परिस्थितीप्रमाणे स्वतःला तयार करतो की किंवा गोलंदाजावर दबाव आणायचा आहे. असे तो म्हणाला.
चॅम्पियन्स ट्रॉफी अंतिम सामन्यापूर्वी शुभमन गिलने त्याचे म्हणणे मांडले. यादरम्यान तो म्हणाला की तो त्याची फलंदाजी खूप एन्जॉय करतो आणि यासाठी तो रोहित शर्माचे आभार मानतो. तो म्हणाला रोहित शर्मामुळे माझ्यावर कमी दबाव राहतो.
चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत फलंदाज म्हणून रोहित शर्माला संघर्ष करावा लागत आहे. रोहित शर्माच्या फलंदाजीवर सातत्याने प्रश्न उपस्थित होत आहेत. टीकाकार त्याच्या फलंदाजीवर टीका करत आहेत. त्यादरम्यान भारतीय संघाचे प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी रोहित शर्माच्या फॉर्म बद्दल भाष्य केले ते म्हणाले, जर तुमचा कर्णधार या प्रकारची फलंदाजी करत असेल तर ड्रेसिंग रूम मध्ये खूप महत्त्वाचा संदेश जातो. बाकीच्या खेळाडूंना दबावाशिवाय खेळण्याची प्रेरणा मिळते. त्यानंतर गौतम गंभीर असेही म्हणाले, की तुम्ही रोहित शर्माला तो किती धावा करेल या दृष्टीने बघता पण आम्ही त्याला तो संघावर कशाप्रकारे इम्पॅक्ट करतो या आधारे बघतो. त्या दृष्टीत फक्त एवढेच अंतर आहे.
वनडे वर्ल्ड कप 2019 मध्ये रोहित शर्माने प्रभावी फलंदाजी केली होती. त्या स्पर्धेत रोहित शर्माने 5 वेळा शतकी खेळी केली होती. पण त्यानंतर तब्बल सहा वर्षांमध्ये रोहितने फक्त 4 शतक ठोकले आहेत. पण या गोष्टीत कोणतीही शंका नाही की, रोहित शर्मा ज्या प्रकारे फलंदाजीची सुरुवात करतो त्यामुळे पुढच्या फलंदाजांना खेळण्यासाठी हिम्मत मिळते. आकडे सांगतात की रोहित शर्माने त्याच्या 18 वर्षांच्या वनडे करिअरमध्ये पाच वर्षात 100 पेक्षा अधिक स्ट्राइक रेटने धावा केल्या आहेत.
हेही वाचा
चॅम्पियन्स ट्रॉफी फायनलसाठी संघ सज्ज, न्यूझीलंडला मोठा धक्का बसणार?
भारत विरुद्ध न्यूझीलंड नॉकआउट संघर्ष, आकडे सांगतात धक्कादायक गोष्ट
गतविजेता आरसीबी संघ डब्ल्यूपीएल स्पर्धेमधून बाहेर, यूपी वॉरियर्सकडून दारुण पराभव