---Advertisement---

6,6,6,6,6… वादळाचं दुसरं नाव म्हणजे ‘विल जॅक्स’! गुजरातविरुद्ध अवघ्या 41 चेंडूत ठोकलं शतक

---Advertisement---

आरसीबीचा स्टार फलंदाज विल जॅक्सनं गुजरात टायटन्सविरुद्ध आपल्या स्फोटक फलंदाजीनं सर्वांचीच मनं जिंकली. त्यानं अवघ्या 41 चेंडूत झंझावाती शतक ठोकलं.

रविवारी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी क्रिकेट स्टेडियममध्ये विल जॅक्सनं जे केलं याची कल्पनाही कोणी केली नसेल! एकेवेळी तो 17 चेंडूत केवळ 17 धावांवर खेळत होता. सर्वांना विराट कोहलीच्या शतकाची अपेक्षा होती. मात्र विल जॅक्सनं आपल्या शतकानं सर्वांनाच चकित करून टाकलं. त्याचं आयपीएल कारकिर्दीतील हे पहिलेच शतक आहे.

25 वर्षीय विल जॅक्सनं 243 च्या तुफानी स्ट्राईक रेटनं फलंदाजी करत 41 चेंडूत नाबाद 100 धावा केल्या. त्यानं आपल्या खेळीत एकूण 5 चौकार आणि 10 गगनचुंबी षटकार ठोकले. गुजरात टायटन्सचे गोलंदाज त्याच्यासमोर दयेची अक्षरश: भीक मागत होते.

मोहित शर्मा रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूच्या डावातील 15वं षटक टाकण्यासाठी आला होता. विल जॅक्सनं त्या षटकात संपूर्ण सामना पलटवला. मोहित शर्माच्या या षटकात त्यानं एकूण 29 धावा ठोकल्या. जॅक्सनं मोहितला 3 षटकार आणि 2 चौकार मारले. यानंतर राशिद खान पुढचं षटक टाकण्यासाठी आला. मात्र इंग्लिश फलंदाजांनं या अफगाण गोलंदाजाची पूर्ण लाईन-लेन्थचं बिघडवून टाकली. राशिदच्या षटकात त्यानं 4 षटकार आणि 1 चौकार लगावला. आरसीबीने या षटकातही 29 धावा करत सामना जिंकला.

राशिद खानच्या ओव्हरच्या शेवटच्या चेंडूवर विल जॅक्स 94 धावांवर खेळत होता. आरसीबीला विजयासाठी फक्त 1 धावेची गरज होती. जॅक्सला शतक साजरं करायचं असल्यास षटकार मारण्याशिवाय पर्याय नव्हता. घडलही असंच. विल जॅक्सनं राशिद खानला स्विप शॉटवर एक जबरदस्त षटकार ठोकला आणि आरसीबीला सामना जिंकवून देत आपलं शतकही पूर्ण केलं. आरसीबीनं 201 धावांचा आव्हान 16 षटकांतच गाठलं.

सामन्याबद्दल बोलायचं झालं तर, गुजरात टायटन्सनं नाणेफेक हारल्यानंतर 20 षटकात 3 गडी गमावून 200 धावा केल्या होत्या. 201 धावांचं लक्ष्य बंगळुरूनं अवघ्या 16 षटकांत गाठलं आणि सामना 9 गडी राखून जिंकला.

महत्त्वाच्या बातम्या – 

अद्भूत, अविश्वसनीय! 200 धावांचा पाठलाग अवघ्या 16 षटकांत! कोहली-जॅक्सनं गुजरातला घरच्या मैदानावर रडवलं

शाहरुख खानच्या बॅटमधून अखेर धावा निघाल्या! आरसीबीविरुद्ध ठोकलं झंझावाती अर्धशतक

ग्लेन मॅक्सवेलचा जोरदार कमबॅक! 3 सामन्यांच्या ब्रेकनंतर परतताच घेतली कर्णधार गिलची विकेट

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---