महिला हॉकी विश्वचषकासाठी भारतीय संघ जाहीर झाला आहे. एफआयएचच्या अंतर्गत ही स्पर्धा नेदरलॅंड आणि स्पेन येथे १ ते १७ जुलै, २०२२ दरम्यान खेळवली जाणार आहे. भारताचा संघ पूल बी या गटात आहे. यामध्ये इंग्लंड, न्यूझीलंड आणि चीन या संघांचा समावेश आहे. या स्पर्धेत भारतीय संघात मोठे बदल पाहायला मिळाले आहेत.
या स्पर्धेसाठी भारताचे नेतृत्व गोलकिपर सविता पूनिया करणार आहे, तर उपकर्णधारपद दीप ग्रेस इक्काकडे सोपवले आहे. २० जणींच्या या संघामध्ये सविता बरोबर वंदना कटारिया, लालरेमसियामी, नवनीत कौर आणि शर्मिला देवी ही अनुभवी फॉरवर्ड लाईन असणार आहे.
लंडन येथे झालेल्या मागच्या विश्वचषक स्पर्धेत भारत उपांत्यपूर्व फेरीत पोहोचला होता. आयर्लंड विरुद्ध शूटआऊटमध्ये ३-१ असा पराभव झाल्याने संघ स्पर्धेबाहेर झाला होता. माजी कर्णधार आणि अनुभवी हॉकीपटू राणी रामपालचा संघात समावेश नसल्याने सगळ्यांनी आश्चर्य व्यक्त केले आहे. टोकियो ऑलम्पिकनंतर तिच्या पायाला गंभीर दुखापत झाली होती. तिला युरोप प्रो लीग बेल्जियम आणि नेदरलॅंड विरुद्ध सामन्यांसाठी संघात जागा दिली होती. तेव्हा दुखापतीने पुन्हा एकदा तोंड वर काढल्याने ती सलग चार सामन्यात खेळली नाही. तिची ही दुखापतच विश्वचषकातून बाहेर पडण्यास मुख्य कारण बनली आहे.
भारतीय संघाचे मुख्य प्रशिक्षक म्हणाले, “आम्ही सर्वश्रेष्ठ संघ निवडला आहे. या संघामध्ये अनुभवी आणि युवा खेळाडूंचा समावेश आहे. याच खेळाडूंनी एफआयएच प्रो लीगमध्ये तगड्या संघाविरुद्ध उत्तम कामगिरी केली आहे.”
“राणीची दुखापत पूर्णपणे सुधारली नसून तिला संघात निवडले नाही. यामध्ये राणी वगळता ऑलिम्पिक स्पर्धेतील सर्व खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे,” असे यानेक शॉपमॅन यांनी राणीच्या अनुपस्थितीचे कारण सांगितले आहे.
भारतीय संघ साखळी सामने ऍमस्टेलवीन, नेदरलॅंड येथे खेळणार आहेत. त्याच्या गटामध्ये ते अव्वल राहिले तर उपांत्यपूर्व फेरीचे सामना ऍमस्टेलवीन येथे होईल. स्पेन येथे उपांत्य आणि अंतिम सामना खेळला जाणार आहे.
भारत या स्पर्धेतील पहिला सामना तीन जुलैला इंग्लंड विरुद्ध खेळणार आहे. टोकियो ऑलिम्पिकमध्ये कांस्य पदकाच्या सामन्यात इंग्लंडने भारताचा पराभव केला होता.
विश्वचषकासाठी भारतीय संघ-
गोलकिपर- सविता पूनिया, बिचू देवी खरीबाम
डिफेंडर्स- दीप ग्रेस इक्का, गुरजीत कौर, निक्की प्रधान, उदिता
मिडफिल्डर्स- निशा, सुशिला चानू पुख्रमबम, मोनिका, नेहा, ज्योती, नवजोत कौर, सोनिका, सलिमा टेटे
फॉरवर्ड्स– वंदना कटारिया, लालरेमसियामी, नवनीत कौर, शर्मिला देवी
बदली खेळाडू– अक्षता आबासो धेकळे, संगीता कुमारी
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
BIG BREAKING । भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीला कोरोनाची लागण, कसोटी खेळण्यावर प्रश्नचिन्ह
रोहित-विराटला ‘ही’ चूक चांगलीच भोवली, बीसीसीआयने फटकारल्याने दोघांच्या अडचणीत वाढ
वनडे क्रिकेटच्या इतिहासात ‘अशी’ कामगिरी करणारा डेविड वॉर्नर ठरला दुसराच खेळाडू