भारत आणि न्यूझीलंड यांच्यात सुरू असलेल्या विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात, पावसाने धुमाकूळ घातला आहे. पहिल्या दिवस (१८ जून) पूर्णपणे पावसामुळे रद्द करण्यात आला होता. त्यानंतर दुसऱ्या दिवशी देखील कमी प्रकाशामुळे खेळ तीन वेळा थांबवावा लागला होता. अशातच तिसऱ्या दिवशी देखील क्रिकेट चाहत्यांच्या हाती निराशा लागू शकते.
हा सामना साउथम्प्टनच्या रोज बाउल स्टेडियममध्ये खेळवण्यात येत आहे. या सामन्यातील तिसऱ्या दिवसाचा खेळ सुरू होण्यापूर्वी, युके मेट ऑफिसच्या अहवालानुसार, साउथम्प्टनमध्ये येल्लो अलर्ट लागू करण्यात आला आहे. तसेच पुर येण्याचे देखील संकेत देण्यात आले आहेत. त्यामुळे कर्णधार विराट कोहलीला आणि उपकर्णधार अजिंक्य रहाणे यांना फलंदाजीसह कमी प्रकाश आणि पावसामुळे घेतल्या जाणाऱ्या विश्रांतीसाठी तयार राहावे लागणार आहे. (World test championship final : Weather report of Southampton )
विश्व कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यातील येणाऱ्या दिवसात असे असेल वातावरण
तिसरा दिवस (१९ जून, रविवार): सकाळी पाऊस पडण्याची ५०% शक्यता. तिसऱ्या दिवसाचा सामना सुरू होण्यासाठी उशीर होऊ शकतो. परंतु त्यानंतर ऊन असेल. तरीदेखील पाऊस पडण्याची शक्यता असणार आहे.
चौथा दिवस (२० जून, सोमवार): चौथ्या दिवशीही सामन्यासाठी वातावरण अनुकूल नसेल. युके मेटच्या अहवालानुसार, या दिवशी पूर्ण दिवस थांबून थांबून पाऊस पडू शकतो.
पाचवा दिवस (२१ जून, मंगळवार): सामन्याच्या पाचव्या दिवशीही पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे. पाचव्या दिवशी सकाळी पाऊस पडण्याची शक्यता ६०% असणार आहे.
सहावा दिवस, राखीव दिवस (२२ जून, बुधवार): या सामन्यात सहाव्या दिवशी वातावरण अनुकूल असेल असे म्हटले जात आहे. या दिवशी साउथम्प्टनमध्ये ऊन असणार आहे. तसेच पाऊस पडण्याची कुठलीही शक्यता वर्तवली गेली नाहीये. जर कमी प्रकाश किंवा वातावरण चांगले नसल्यामुळे सामना पहिल्या ५ दिवसात पूर्ण झाला नाही. यासाठी राखीव दिवस ठेवला आहे. जेणेकरून ६ व्या दिवशी सामन्याचा निर्णय येऊ शकेल.
भारतीय संघाने दुसऱ्या दिवसाच्या अखेर ६४.४ षटकात १४६ धावा केल्या आहेत. कर्णधार कोहली नाबाद ४४ धावांवर फलंदाजी करत आहे. तर उपकर्णधार अजिंक्य रहाणे नाबाद २९ धावांवर फलंदाजी करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पव्हेलियनमध्ये बसून दुर्बिनने रोहित पाहात होता विराटची खेळी; नेटकरी म्हणाले, ‘हीच खरी मैत्री’
रोहितविषयी बोलत असलेल्या समालोचकाला दिनेशने केले ट्रोल; नेटकरी म्हणाले, ‘मौज कर दी’
‘पाऊस आमचा जल्लोष काय थांबवणार’, म्हणत चाहत्यांनी गायले हिटमॅन सॉन्ग; एकदा ऐकाच