---Advertisement---

टॉप ५: शिखर धवनने शतकी खेळीबरोबरच केले हे खास ५ विक्रम

---Advertisement---

लंडन। आज 2019 विश्वचषकातील 14 वा सामना भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघात होत आहे. द ओव्हल मैदानावर सुरु असलेल्या या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज शिखर धवनने शतकी खेळी केली आहे.

त्याने या सामन्यात 109 चेंडूत 117 धावांची शतकी खेळी केली. यात त्याने 16 चौकार मारले. हे शतक त्याने 95 चेंडूत पूर्ण केले होते. तसेच हे त्याचे वनडे कारकिर्दीतील 17 वे शतक आहे. त्याचबरोबर शिखरने आज चांगली सुरुवात करताना रोहित शर्माबरोबर 127 धावांची सलामी भागीदारीही रचली. रोहित 57 धावा करुन बाद झाला.

शिखरने या शतकाबरोबरच काही खास विक्रमांनाही गवसणी घातली आहे, ते असे – 

1. इंग्लंडमध्ये वनडेत 4 शतके करणारा शिखर धवन पहिला भारतीय क्रिकेटपटू. याआधी सचिन तेंडुलकर आणि रोहित शर्माने इंग्लंडमध्ये खेळताना वनडेमध्ये 3 शतके केली आहेत.

2. शिखर धवनचे हे विश्वचषकातील तिसरे शतक. त्यामुळे वनडे विश्वचषकात सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीय क्रिकेटपटूंमध्ये शिखर तिसऱ्या क्रमांकावर विराजमान. पहिल्या क्रमांकावर 6 शतकांसह सचिन तेंडुलकर, तर दुसऱ्या क्रमांकावर 4 शतकांसह सौरव गांगुली.

3. वनडे विश्वचषकात ऑस्ट्रेलिया विरुद्ध शतक करणारा शिखर धवन दुसरा भारतीय क्रिकेटपटू. याआधी अजय जडेजाने जून 1999 मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध विश्वचषकात शतक केले होते. विशेष म्हणजे या दोघांनीही द ओव्हल मैदानावरच शतकी खेळी केल्या आहेत.

4. आयसीसीच्या वनडे स्पर्धांमध्ये शिखरचे हे 6 वे शतक. त्यामुळे तो आयसीसीच्या स्पर्धांमध्ये सर्वाधिक शतके करणाऱ्या क्रिकेटपटूंमध्ये कुमार संगकारा आणि रिकी पाँटींगसह दुसऱ्या क्रमांकावर विराजमान. या यादीत 7 शतकांसह सचिन तेंडुलकर आणि सौरव गांगुली संयुक्तरित्या अव्वल स्थानावर.

5. वनडे विश्वचषकात शिखरच्या 500 धावा पूर्ण. वनडे विश्वचषकात 500 धावा करणारा शिखर 14 वा भारतीय क्रिकेटपटू. त्याच्या आता वनडे विश्वचषकात 10 सामन्यात 53.70 च्या सरासरीने 537 धावा पूर्ण.

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या –

फ्रेंच ओपन २०१९: ऍश्ले बार्टीला विजेतेपद; ऑस्ट्रेलियाची ४६ वर्षांची प्रतिक्षा संपुष्टात

विश्वचषक २०१९: हिटमॅन रोहित शर्माने मास्टर ब्लास्टरला मागे टाकत रचला नवा विश्वविक्रम

विश्वचषक २०१९: फलंदाज क्लिन बोल्ड तर झालाच पण तो चेंडू सीमारेषेपारही गेला, पहा व्हिडिओ

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment