---Advertisement---

डिवाईनच्या वादळात उडाली गुजरात! 189 धावांचा आरसीबीकडून यशस्वी पाठलाग

---Advertisement---

वुमेन्स प्रिमियर लीगमध्ये शनिवारी (18 मार्च) दिवसातील दुसरा सामना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर विरुद्ध गुजरात जायंट्स असा खेळला गेला. मोठ्या धावसंख्येच्या झालेल्या या सामन्यात आरसीबीने 8 विकेट्सने विजय मिळवत स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. सोफी डिवाईनने ठोकलेल्या 99 धावा आरसीबीचा विजयाचे वैशिष्ट्य ठरले.

 

ब्रेबॉर्न स्टेडियम येथे खेळल्या गेलेल्या या सामन्यात गुजरातची कर्णधार स्नेह राणाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. आक्रमक सलामीवीर सोफिया डंकली केवळ 16 धावा करत बाद झाली. त्यानंतर लॉरा वॉल्वर्ट व मेघना ही जोडी जमली. दोघींनी सुरुवातीला संघाचा डाव सावरण्याचा निर्णय घेतला. एकेरी दुहेरी धावांसह खराब चेंडूंवर त्यांनी षटकार चौकार वसूल केले. मेघनाने 31 धावांचे योगदान दिले. ती बाद झाल्यानंतर लॉराने स्पर्धेतील सलग दुसरे अर्धशतक पूर्ण केले.

चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या ऍश्ले गार्डनरने सुरुवातीपासूनच आक्रमक पवित्रा घेतला. त्यावेळी लॉरा 42 चेंडूत 68 धावांची खेळी करून बाद झाले. गार्डनरने 26 चेंडूवर 41 धावा कुटल्या. हरलीन देओल व हेमलता यांनी अखेरच्या षटकांमध्ये आक्रमक फटकेबाजी करत गुजरात संघाला 188 पर्यंत मजल मारून दिली.

स्पर्धेतील आव्हान कायम राखण्यासाठी आरसीबीला हा सामना जिंकणे अनिवार्य होते. त्या दृष्टीने सोफी डिवाईन हिने तुफानी फटकेबाजी सुरू केली. आतापर्यंत अपयशी ठरत असलेल्या स्मृती मंधानाने एक बाजू लावून धरली. दरम्यान सोफीने 20 चेंडूंवर आपले अर्धशतक पूर्ण केले. दुसरीकडे स्मृती 37 धावांवर बाद झाली. दोघींनी संघाला 9.2 षटकात 125 धावांची सलामी दिली. सोफी शतकाकडे वाटचाल करत असताना 36 चेंडूवर 9 चौकार व 8 षटकारांच्या मदतीने 99 धावांवर बाद झाली. त्यानंतर एलिस पेरी व हिदर नाईट यांनी आणखी बळी न जाऊ देता विजय साकार केला.

 

(WPL 2023 RCB Beat Gujarat Giants By 8 Wickets Smriti Mandhana Sophie Devine Shines)

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---