टीम इंडियाचा यष्टिरक्षक फलंदाज वृद्धिमान साहा आंतरराष्ट्रीय क्रिकेटपासून दूर जात आहे. डिसेंबर २०२१ नंतर तो एकही कसोटी किंवा एकदिवसीय सामना खेळला नाही. नुकतेच साहाच्या वेदनांना उधाण आले. त्याने याबाबत एक भावुक वकतव्य करत आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत.
“मला वाटत नाही की मी आता टीम इंडियामध्ये परतेन. तो म्हणतो की, निवडकर्त्यांना संघात समाविष्ट करायचे असते तर आयपीएलनंतर त्यांना संधी देता आली असती. पण असे झाले नाही”, असं म्हणत साहाने आपल्या वेदना जाहिर केल्या आहेत. शिवाय आपल्या कारकार्दिीत आपण चांगल्या फॉर्ममध्ये असूनही निवडकर्ते आपल्याला संधी देत नसल्याची भावनाही त्याने व्यक्त केली आहे.
साहाने आपल्या कारकिर्दीबद्दल मोकळेपणाने सांगितले. टीम इंडियाचा हा यष्टिरक्षक फलंदाज आता परतणार नाही, असं वाटतंय. एका वृत्तसंस्थेच्या बातमीनुसार साहा म्हणाला की, “मला वाटत नाही की मी आता भारतीय संघात सामील होईल, कारण मुख्य निवडकर्ते आणि प्रशिक्षकांनी मला याबद्दल आधीच सांगितले आहे. टीम इंडियात त्याचा समावेश करायचा असता तर आयपीएलनंतर त्याला संधी देता आली असती. माझ्याकडे कमी पर्याय शिल्लक असल्याचे आधीच स्पष्ट केले आहे. मात्र, माझे पूर्ण लक्ष क्रिकेटवर केंद्रित करणे माझ्यासाठी महत्त्वाचे आहे. जोपर्यंत मला खेळाची आवड आहे तोपर्यंत मी खेळत राहीन.”
विशेष म्हणजे साहाने आयपीएल २०२२ मध्ये चांगली कामगिरी केली होती. त्याने ११ सामन्यात ३१७ धावा केल्या. यादरम्यान त्याने ३ अर्धशतकेही झळकावली. साहाची सर्वोत्तम धावसंख्या ६८ धावा होती. साहाने डिसेंबर २०२१ मध्ये न्यूझीलंडविरुद्ध शेवटचा कसोटी सामना खेळला होता. त्याने आतापर्यंत खेळलेल्या ४० कसोटी सामन्यांमध्ये १३५३ धावा केल्या आहेत. यादरम्यान साहाने ३ शतके आणि ६ अर्धशतके झळकावली आहेत. त्याची सर्वोत्तम कसोटी धावसंख्या ११७ धावा आहे.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘मला तुमच्या प्रार्थनांची गरज!’, केएल राहुल कडून भावनिक पोस्ट शेअर
‘भुवीच्या गोलंदाजीमुळेच आमच्या संघावर दबाव वाढला’, आफ्रिकेच्या दिग्गज खेळाडूची कबूली
कार्तिक टी२० विश्वचषक खेळणार?, प्रशिक्षक राहुल द्रविडने दिले महत्त्वाचे संकेत