पुणे। अजमेरा रेसिंगचा पुणेकर रायडर युवराज कोंडेदेशमुख याने एमआरएफ मोग्रीप-एफएमएससीआय राष्ट्रीय सुपरक्रॉस मालिकेतील अखेरच्या फेरीत विजेतेपद मिळविले. राष्ट्रीय जेतेपद टीव्हीएसच्या सी. डी. जीनन याने मिळविले.
मुंढवा येथील पासपोर्ट कार्यालयाशेजारील मैदानावरील ट्रॅकवर प्रजासत्ताकदिनी ही स्पर्धा पार पडली. ही अखेरची फेरी असल्यामुळे प्रत्येक गटाच्या प्रत्येक शर्यतीत जोरदार चुरस झाली. क्लास 1 मध्ये टीव्हीएस रेसिंगच्या सी. डी. जीनन याने युवराजवर 38 गुणांची आघाडी घेतली होती. त्यामुळे जास्त धोका न पत्करता दोन्ही मोटो पूर्ण करणे त्याच्यासाठी आवश्यक होते.
युवराजने दोन्ही मोटो कौशल्य पणास लावत जिंकले. पहिल्या मोटोत त्याची सुरवात चांगली झाली नव्हती. तो चौथ्या क्रमांकावर होता. त्यानंतर त्याने आधी जावेद शेख व नंत ऋग्वेद बारगुजे यांना मागे टाकले.
शेवटच्या दोन लॅपमध्ये वेग वाढवित त्याने जीननला मागे टाकले. दुसऱ्या मोटोत त्याने सुरवात चांगली केली आणि आघाडी कायम राखली. पुण्याच्याच ऋग्वेदने दुसरा क्रमांक मिळविला. युवराजने 40 गुण मिळविले, जीननला 32 गुणांची कमाई झाली.
ज्यूनियर गटात युवराज कोंडेदेशमुखने निर्विवाद वर्चस्व राखत दोन्ही मोटो जिंकले. सबज्यूनीयर गटात साताऱ्याच्या इक्षण शानभागने ही कामगिरी केली. या दोन्ही गटांत त्याची बहिण तनिका हिचा सहभाग लक्षेधी ठरला. याशिवाय यामाहा चालविणाऱ्या चैतन्य जोशीने प्रदर्शनी रायडिंग केले. त्यामुळे त्याचेही कौतूक झाले.
या मालिकेचे प्रवर्तक असलेल्या गॉडस्पीडचे संस्थापक व माजी आंतरराष्ट्रीय रायडर श्याम कोठारी यांनी सांगितले की, जास्त ऊन असूनही पुणेकर रेसिंगप्रेमींनी गर्दी केली होती. आव्हानात्मक ट्रॅकवर सर्व शर्यती सुरळीत पार पडल्या.
रशियाचे करीमोव रोमन आणि अँटोनोव पावेल यांनी सादर केलेले स्टंट उपस्थितांना श्वास रोखून धरायला लावणारे होते. ज्यूनीयर गटात इक्षण आणि श्लोक यांच्यात कडवी चुरस झाली. पृथ्वी आणि महेश यांनीही रंगत निर्माण केली. पिंकेशने विजय मिळवून पुनरागमन केले.
सविस्तर निकाल।
गट 1 (250 सीसी 2 स्ट्रोक, 500 सीसी 4 स्ट्रोक)। 1) युवराज कोंडेदेशमुख (पहिला मोटो 20+दुसरा मोटो 20, एकूण 40, केटीएम 25-अजमेरा रेसिंग), 2) ऋग्वेद बारगुजे (15+175-32, टीव्हीएस आरटीआर, टीव्हीएस रेसिंग), 3) सी. डी. जीनन (17+15, 32, टीव्हीएस आरटीआर, टीव्हीएस रेसिंग), 4) व्ही. एम. महेश (11+13, 24, कावासाकी, त्रिचूर), 5) पृथ्वी धिल्लन (13+10, 23, कावासाकी, चंडीगड)
गट 2 (नोव्हीस 2-4 स्ट्रोक 266 सीसी पर्यंत) ः 1) एम. कालीमोहन (20, टीव्हीएस आरटीआर 180, टीव्हीएस रेसिंग), 2) डी. सचिन (टीव्हीएस आरटीआर 180, टीव्हीएस रेसिंग), 3) आर. ई. राजेंद्र (15, टीव्हीएस आरटीआर 180, टीव्हीएस रेसिंग), 4) बांतेईलांग ज्यीर्वा (13, टीव्हीएस आरटीआर 180, टीव्हीएस रेसिंग), 5) आर. सबरीश (11, हिरो इम्पल्स, कोईमतूर)
क्लास 4। 1) पिेंकेश ठक्कर (20, इम्पल्स, पुणे), 2) लोकेश भोसले (17, इम्पल्स, पुणे), 4) प्रसाद घोरपडे (13, इम्पल्स, कोल्हापूर), 5) शिवम कांबळे (11, इम्पल्स, पुणे)
गट 5 (इंडियन एक्स्पर्ट 2-4 स्ट्रोक 260 सीसी पर्यंत)। 1) डी. सचिन (20, टीव्हीएस आरटीआर 180, टीव्हीएस रेसिंग), 2) आर. ई. राजेंद्र (टीव्हीएस आरटीआर 180, टीव्हीएस रेसिंग), 3) इम्रान पाशा (15, टीव्हीएस आरटीआर 180, टीव्हीएस रेसिंग), 5) एम. कालीमोहन (13, टीव्हीएस आरटीआर 180, टीव्हीएस रेसिंग), 5) बांतेईलांग ज्यीर्वा (11, टीव्हीएस आरटीआर 180, टीव्हीएस रेसिंग)
गट 6 (प्रायव्हेट एक्स्पर्ट-2-4 स्ट्रोक 260 सीसीपर्यंत)। 1) आर. सतीश (20, इम्पल्स, कोईमतूर), 2) अंकुश राव (17, इम्पल्स,गोवा), 3) शिवम कांबळे (15, इम्पल्स, पुणे), 4) पिंकेश ठक्कर (13, इम्पल्स, पुणे), 5) भुषण भोसले (11, इम्पल्स, कोल्हापूर)
गट 7 (250 सीसी 2 स्ट्रोक, 500 सीसी 4 स्ट्रोक)। 1) पृथ्वी धिल्लन (पहिला मोटो 20+दुसरा मोटो 20, एकूण 40, कावासाकी, चंडीगढ), 2) व्ही. एम. महेश (17+17, 34, कावासाकी, त्रिचूर), 3) झाबी मुल्ला (15+15, 30, केटीएम 250, गोवा), 4) तनिका शानभाग (10+13, 23, केटीएम 250, सातारा), 5) पी. पृथ्वी (13+7, 20, कावासाकी, इर्नाकुलम)
गट 8 (ज्यूनीयर एसएक्स1)। 1) युवराज कोंडेदेशमुख (20+20, 40, केटीएम 250, अजमेरा रेसिंग), 2) गौरांग नाईक (13+15, 28, कावासाकी, पुणे), 3) इक्षण शानभाग (17+11, 28, केटीएम एसएक्स, सातारा), 4) सार्थक चव्हाण (8+17, 25, कावासाकी, पुणे), 5) तनिका शानभाग (11+133, 24, केटीएम 250, सातारा)
गट 9 (ज्यूनीयर एसएक्स2)। 1) इक्षण शानभाग (20+20, 40, केटीएम 85, सातारा), 2) श्लोक घोरपडे (17+17, 34, कावासाकी, सातारा), 3) जितेंद्र संगवे (15+15, 30, केटीएम 85, इचरकरंजी), 4) अक्षत हुपळे (13+13, 26, केटीएम 65, पुणे), 5) अभिमन्यू बोस (10+11, 21, केटीएम65, गोवा)
प्रदर्शनी सहभाग। चैतन्य जोशी (यामाहा पीडब्ल्यू, पुणे)
सर्वोत्तम रायडर। युवराज कोंडेदेशमुख