आयपीएल २०१८ सुरु होण्यासाठी काहीच दिवस शिल्लक राहिले आहेत. त्यामुळे खेळाडूही आयपीएलच्या तयारीला लागले आहेत. नुकताच भारताचा अष्टपैलू खेळाडू युवराज सिंगने त्याच्या नवीन लुकचा फोटो इंस्टाग्रामवर शेयर केला आहे. पण त्याच बरोबर त्याने यात केएल राहुलची माफीही मागितली आहे.
युवराजचे नुकतेच हाकिम अलिम या सेलिब्रेटी हेअरस्टायलिशने लांब केस कापले असून युवराजला नवीन लुक दिला आहे. याच नवीन लूकचा फोटो युवीने शेयर केला असून त्यात त्याने त्याचे लांब केस कापल्याबद्दल के एल राहुलची माफी मागितली आहे.
https://www.instagram.com/p/BgrOrM1BFsS/?taken-by=yuvisofficial
तसेच त्याने हे देखील सांगितले की त्याला केस कापण्यासाठी त्याचा मित्र अंगद बेदीने भाग पाडले. याबरोबरच युवराजने त्याला नवीन लुक दिल्याबद्दल हाकिम अलिमला धन्यवाद म्हटले आहे.
युवराज आणि के एल राहुल यावर्षी किंग्स इलेव्हन पंजाब या संघाकडून आयपीएलमध्ये एकत्र खेळताना दिसणार आहेत. के एल राहुलला यावर्षी आयपीएल लिलावात पंजाब संघाने ११ कोटी किंमत देऊन संघात सामील करून घेतले होते.
तसेच युवराजचे यावर्षी पंजाब संघात पुनरागमन झाले आहे. २००८ च्या आयपीएलच्या पहिल्या मोसमात युवराजच्या नेतृत्वाखाली पंजाब संघाने उपांत्य फेरीपर्यंत मजल मारली होती.
आयपीएलच्या आधी नवीन लुक करणारा युवराज पहिलाच खेळाडू नसून रॉयल चॅलेंजर्स बंगलोर संघाचा कर्णधार विराट कोहलीनेही काही दिवसांपूर्वी हाकिम अलिम यांच्याकडूनच केस कापून घेतले आहेत.
https://www.instagram.com/p/Bgi375cgidY/?taken-by=virat.kohli