फलंदाजी, गोलंदाजी आणि क्षेत्ररक्षण हे क्रिकेटचे तीन मुख्य विभाग आहेत. फलंदाज आपापल्या शैलीनुसार वेगवेगळ्या पद्धतीने फलंदाजी करत असतात. गोलंदाजांनाही गोलंदाजी करण्यासाठी अनेक पर्याय उपलब्ध असतात. यॉर्कर, बाउंसर, ऑफ स्पिन, लेग स्पिन, फुल टॉस अशा वेगवेगळ्या प्रकारे गोलंदाज चेंडू टाकत असतात.
आंतरराष्ट्रीय स्तरावरील गोलंदाजापासून ते गल्ली-बोळात वेडीवाकडी गोलंदाजी करणाऱ्या मुलांपर्यंतचे व्हिडिओ सोशल मीडियावर बऱ्याचदा व्हायरल होताना दिसत असतात. कित्येक आजी-माजी क्रिकेटपटूदेखील प्रतिभावंत मुलांचे क्रिकेट खेळतानाचे व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. नुकताच भारताचा माजी अष्टपैलू युवराज सिंग याने अजब ढंगात गोलंदाजी करणाऱ्या एका खेळाडूचा व्हिडिओ इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
युवराजने शेअर केलेल्या या व्हिडिओत काही खेळाडू क्रिकेटचा सराव करताना दिसत आहेत. यावेळी गोलंदाजी करणारा व्यक्ती गोल गोल फिरत येऊन चेंडू टाकत असल्याचे दिसत आहे. त्याची गोलंदाजी करण्याची पद्धती अगदी प्रसिद्ध नृत्यप्रकार भरतनाट्यमसारखी भासत आहे. त्याच्या या चेंडूवर फलंदाज थोडक्यात बाद होताना वाचला असल्याचेही दिसत आहे.
युवराजने व्हिडिओ शेअर करत कॅप्शनमध्ये लिहिले आहे की, “भरतनाट्यम स्टाइल ऑफ स्पिन!! हरभजन सिंग तुझे याविषयी काय म्हणणे आहे?”. युवराजने शेअर केलेल्या व्हिडिओवर नेटकऱ्यांच्या वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत.
https://www.instagram.com/p/CKExkkZDC9h/?utm_source=ig_web_button_share_sheet
माजी भारतीय दिग्गज हरभजन सिंग हा फिरकीपटू गोलंदाज होता. त्यामुळे तो अधिकतर ऑफब्रेक गोलंदाजी करत असे. कदाचित याच कारणामुळे युवराजने हरभजनला भरतनाट्यम ऑफ स्पिन गोलंदाजी संदर्भात त्याचे मत विचारले असावे. आता यावर हरभजन काय प्रतिक्रिया देईल? याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
पडद्यामागचा खरा नायक! हार्दिक-कृणालच्या वडिलांच्या त्यागाची कहाणी, वाचून व्हाल भावनिक
स्वागत तर व्हायलाच हवं! झुंजार द्विशतकानंतर जो रुटचे ड्रेसिंग रुममध्ये जल्लोषात वेलकम, पाहा व्हिडिओ
काय सेटिंग आहे भिडू!! मोठ्या पहाडीच्या काठावर चिमुकल्यांनी मांडला क्रिकेटचा डाव, एकदा व्हिडिओ बघाच