सध्या संपूर्ण भारत शोकसागरात बुडाला आहे. शुक्रवारी (दि. 02 जून) ओडिसा राज्यातील बालासोर येथे सायंकाळी भीषण रेल्वे अपघात झाला. या अपघातात दोनशेहून अधिक लोक मृत्यूमुखी पडले. या घटनेने संपूर्ण देशाला हादरून सोडले आहे. या घटनेवर देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अशात आता भारतीय संघाचा फिरकीपटू युझवेंद्र चहल याने या अपघातात जखमी झालेल्या लोकांसाठी एक लाख रुपयांची मदत केली आहे.
ओडिसा राज्यातील बालासोर येथे शुक्रवारी एकाच वेळी तीन रेल्वेचा भीषण अपघात घडला. मागील 75 वर्षातील हा सर्वात मोठा रेल्वे अपघात असल्याचे म्हटले जात आहे. त्यानंतर जगभरातून या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या तसेच जखमी झालेल्या लोकांना मदत सुरू झालीये. नुकतीच एससी आऊट या ऑनलाइन गेमिंग प्लॅटफॉर्मने या अपघातात जखमी झालेल्या लोकांना मदत करण्यासाठी एक गेम स्ट्रीम केली होती. ती गेम पाहण्यासाठी हजर असलेल्या चहल याने त्यावेळी एक लाख रुपये त्या मदत निधीमध्ये दिले. त्याच्या या कृतीचे अनेक जण कौतुक करत आहे.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या लोकांच्या मुलांना मोफत शिक्षण देण्याची घोषणा भारताचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याने केली. आपल्या वीरेंद्र सेहवाग इंटरनॅशनल स्कूल या बोर्डिंगमध्ये तो या मुलांना प्रवेश देणार आहे. यासोबतच भारताचा वरिष्ठ फलंदाज विराट कोहली याने देखील या अपघातानंतर ट्विट करत आपल्या संवेदना व्यक्त केलेल्या. सध्या या घटनेचे पुनर्वसन कार्य सुरू असून, भारतीय सैन्य व एनडीआरएफ हे युद्ध पातळीवर काम करताना दिसून येत आहेत.
(Yuzi Chahal donated 1 Lakh for the Odisha train accident in the stream conducted by the “scOut” gaming channel for charity work for the train accident)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
हेजलवूडच्या जागी ऑस्ट्रेलियाच्या ताफ्यात सामील झालेला पठ्ठ्या आहे तरी कोण, भारताची डोकेदुखी वाढवणार का?
Cricket Ball: डब्ल्यूटीसी फायनलमध्ये वापरला जाणार Duke Ball, ‘या’ 3 चेंडूंनी आख्खं जग खेळतं क्रिकेट