पर्यटनासाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर गेलेला भारताचा माजी गोलंदाज झहीर खानचा त्याच्या क्रिकेटमधील योगदानाबद्दल अॅडिलेड ओव्हल क्रिकेट ग्राऊंडतर्फे शनिवार दि. 9 जून रोजी सत्कार करण्यात आला.
झहीर खानने त्याच्या इंनस्टाग्राम अकाऊंटवर या समारंभाचा फोटो शेअर करून याची माहिती दिली.
या सत्कार समारंभास अॅडिलेड ओव्हल क्रिकेट ग्राऊंडच्या व्यवस्थापकीय मंडळातील सदस्य डॅरेन चॅडलर, साऊथ ऑस्ट्रेलिया पर्यटन विभागाचे संचालक रॉडनी हॉरेक्स आणि साऊथ ऑस्ट्रेलियन सरकारचे अॉस्ट्रेलियातील भारतीय गुंतवणूक प्रमुख राजू नारायनन उपस्थीत होते.
या सत्कार समारंभा प्रसंगी बोलताना बोलताना झहीर भावूक झाला. “तो म्हणाला, माझ्या अॅडिलेड ओव्हल ग्राऊंडशी अनेक आठवणी जोडल्या गेल्या आहेत. अॅडिलेड ओव्हल ग्राऊंड क्रिकेट खेळण्यासाठी सर्वोत्तम ठिकाण आहे. मी प्रत्येकवेळी या ग्राऊंडवर खेळताना क्रिकेटचा आनंद लुटला आहे. भारतीय संघाच्या प्रत्येक अॉस्ट्रेलिया दौऱ्यात मला या मैदानावर खेळण्याची कायम ऊत्सुकता असायची.”
“मला आनंद आहे की, अॅडिलेड ओव्हल क्रिकेट ग्राऊंडने माझ्या कामगिरीची दखल घेऊन माझा हा सन्मान केला. त्याबद्धल मी अॅडिलेड ओव्हल क्रिकेट ग्राऊंडचा ऋणी आहे.”
झहीरने भारताकडून खेळताना 92 कसोटी सामन्यात 32.95 सरसरीने 311 बळी घेतले आहेत. तर एकदिवसीय सामन्यांमध्ये 29.44 सरासरीने 282 बळी घेतले आहेत. तसेच 17 टि-20 सामन्यात भारताचे प्रतिनिधीत्व करताना 17 गडी बाद करण्यात झहीर यशस्वी ठरला आहे.
महत्वाच्या बातम्या-
–गौतम गंभीरने आजपर्यंत एवढा ‘गंभीर’ आरोप कधीच केला नसेल!
–यो यो फिटनेस टेस्ट म्हणजे काय रे भाऊ?