एक जुलैपासून सुरू होणारी ऑस्ट्रेलिया, पाकिस्तान आणि झिंबाब्वे यांच्यातील तिरंगी टी२० क्रिकेट मालिकेवर झिंबाब्वेच्या क्रिकेट खेळाडूंनी झिंबाब्वे क्रिकेट मंडळाला थकवलेले मानधन न दिल्यास तिरंगी मालिकेवर बहिष्कार टाकण्याची धमकी दिली आहे.
झिंबाब्वेतच या मालिकेच आयोजन करण्यात येणार आहे. आर्थिक टंचाईमुळे खेळाडुंबरोबरच सहयोगी स्टाफचे देणे थकले आहे.
२५ जुन हि शेवटची डेडलाईन खेळाडूंनी मंडळाला दिली आहे.
सुत्रांच्या हवाल्यानुसार माहिती मिळतेय की गेल्यावर्षी झिंबाब्वे संघाने जो श्रीलंका दौरा केला होता त्याचे अजूनपर्यंत मानधन खेळाडूंना मिळाले नाही.
झिंबाब्वे क्रिकेट मंडळाला विश्वास आहे की ह्या आठवड्यापर्यंत काहीतरी तोडगा निघेल.