नेपाळ येथे सुरू झालेल्या १३ व्या दक्षिण आशियाई स्पर्धेत उद्या दिनांक ४ डिसेंबर पासून कबड्डी स्पर्धेला सुरुवात होत आहे. एपीएफ हॉल हॉलचॉक, काठमांडू येथे ४ डिसेंबर ते ९ डिसेंबर २०१९ दरम्यान ही कबड्डी स्पर्धा पार पडेल.
पुरुष गटात भारत, नेपाळ, पाकिस्तान, श्रीलंका व बांगलादेश असे पाच संघ सहभागी होणार आहेत. तर महिला गटात भारत, नेपाळ, श्रीलंका व बांगलादेश हे चार संघ सहभागी होत आहेत. २०१६ साली गुवाहाटी येथे झालेल्या दक्षिण आशियाई स्पर्धेत भारताने सुवर्णपदक पटकावले होते.
सुरुवातील प्रत्येक संघ एकमेकांना विरुद्ध प्रत्येकी १-१ सामना खेळेल. त्यातील टॉप 2 संघ हे अंतिम सामन्यात खेळतील. तिसऱ्या क्रमांकाच्या संघास कांस्यपदक देण्यात येईल.
13th South Asian Games 2019, Nepal
Kabaddi Event Schedule@KhelKabaddiNews @KabaddiIndia #SouthAsianGames2019 #Kabaddi pic.twitter.com/edsRw3eSax— Khel Kabaddi (@KhelKabaddiNews) December 3, 2019