सध्या भारत आणि दक्षिण आफ्रिका संघात सुरू असलेल्या टी२० मालिकेकडे सर्वांत लक्ष लागले आहे. पहिल्या दोन सामन्यांत दक्षिण आफ्रिका संघाने भारतावर मात केली. त्यानंतर भारतीय संघ दबावात होता. अशा दबावाच्या स्थितीतही भारतीय संघाने तिसऱ्या आणि चौथ्या टी२० सामन्यात विजय मिळवत मालिकेत बरोबरी साधली. या मालिकेतील चौथ्या सामन्यात सुरुवातीला भारतीय फलंदाजांनी निराश केले. मात्र, अशा वेळी संघाच्या संघाला दिनेश कार्तिक आणि हार्दिक पंड्याच्या जोडीने सावरले. या खेळीबद्दल हार्दिक पंड्याने त्याचे मत व्यक्त केले.
चौथ्या सामन्यांत भारताच्या सलामी आणि मधल्या फळीतील फलंदाजांनी निराशाजनक कामगिरी केली. एकावेळी भारतीय संघाची स्थिती ८१ धावांवर ४ बाद अशी होती. त्यानंतर हार्दिक पंड्या आणि दिनेश कार्तिकने सुरुवातीला संयमी खेळी करत डाव सावरला आणि नंतर शेवटच्या षटकात तडाखेबाज फलंदाजी केली. यावेळी हार्दिकला भारताचा माजी कर्णधार महेंद्रसिंग धोनीने दिलेल्या मुलमंत्राचा फायदा झाला असल्याचे हार्दिकने सांगितले.
https://www.instagram.com/p/Ce7uaTwIR80/?utm_source=ig_web_copy_link
दिनेश कार्तिकने सामना संपल्यानंतर हार्दिकची विशेष मुलाखत घेतली. यावेळी कार्तिकने पंड्याला त्याच्या खेळीबद्दल प्रश्न विचारला. ज्याचे उत्तर देताना पंड्या म्हणाला की, “मी एकदा धोनीला विचारलं होतं, तू दबावाची परिस्थिती कशी हाताळतो?, त्यावर त्याने उत्तर दिलं होते, स्वत:च्या धावांचा विचार न करता संघाला काय गरजेचं आहे त्यावर लक्ष केंद्रीत करायचं. आणि आता मला त्याचा फायदा झाला.”
दरम्यान, चौथ्या टी२० सामन्यांत हार्दिकने ३१ चेंडून ४६ धावा केल्या. यावेळी त्याने प्रत्येकी ३ चौकार आणि षटकार लगावले. हार्दिकने कार्तिकसोबत केलेली खेळी सामन्यासाठी निर्णायक ठरली. आणि भारताला सामन्यात विजय मिळवण्यात मदत मिळाली.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
अरे व्वा! केकेआरनंतर आता ‘या’ क्रिकेट संघाचा मालक बनला शाहरुख खान, पहिल्या सामन्यासाठी उत्सुक
आनंद गगनात मावेना! तब्बल २३ वर्षांनंतर रणजी ट्रॉफीच्या फायनलमध्ये पोहोचला ‘हा’ संघ
‘अब खेलने का नहीं *** का टाईम है’, दिनेश कार्तिकची फलंदाजी पाहून वीरूही झाला फॅन