बीड जिल्ह्या कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने तसेच जय हनुमान क्रीडा मंडळ महासांगवी यांच्या संयुक्त विद्यमाने बीड जिल्हा कबड्डी अजिंक्यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा २०१९ चा आयोजन करण्यात आलं आहे.
सदर जिल्हा अजिंक्यपद स्पर्धा शनिवार दिनांक. ३० नोव्हेंबर व रविवार दिनांक. १ डिसेंबर २०१९ या कालावधीत पार पडेल. जय हनुमान क्रीडा मंडळ, महासांगावी मैदान, ता. पाटोदा जी. बीड येथे होईल. स्पर्धेला उद्घाटक म्हणून मा. विजयसिंह पंडित माजी जिल्हा परिषद अध्यक्ष असतील. तसेच प्रमुख पाहुणे म्हणून ह. भ. प. राधाताई महाराज सनप व मा. श्री रमेश मुलोड तहसीलदार हे उपस्थित असणार आहेत.
बीड जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा किशोर-किशोरी, कुमार-कुमारी व पुरुष-महिला गटात होईल. सदर स्पर्धेतून राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेसाठी बीड जिल्ह्याचे सर्व गटाचे संघ निवडले जातील.