---Advertisement---

भारत-पाकिस्तानचे संघ सापडले नियमाच्या कचाट्यात! आयसीसीने केली दोन्ही संघांवर कठोर कारवाई

On: बुधवार, ऑगस्ट 31, 2022 5:56 PM
---Advertisement---

आशिया चषक 2022 मध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्या दरम्यान रविवारी (28 ऑगस्ट) सामना खेळला गेला . या सामन्यात पाकिस्तानचा पाच गडी राखून पराभव करत भारतीय संघाने आपल्या आशिया चषक मोहिमेची सुरुवात केली. सामना होऊन दोन दिवस झाले असले तरी अद्याप त्या सामन्याची चर्चा सुरू आहे. या महत्त्वाच्या सामन्यात दोन्ही संघांकडून काही चुका झाल्या होत्या. ज्यावर आता आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) सक्त कारवाई केली आहे.

रविवारी दुबई येथे झालेल्या आशिया चषक स्पर्धेतील या दुसऱ्या सामन्यात षटकांची गती योग्य न राखल्याने दोन्ही संघांना दोषी ठरवत आयसीसीने शिक्षा सुनावली आहे. या सामन्यात दोन्ही संघ निर्धारित वेळेपेक्षा दोन षटके मागे होते. यादरम्यान दोन्ही संघांना चालू सामन्यातही शिक्षेला सामोरे जावे लागले होते.‌ त्यानंतर आता संघातील सर्वच खेळाडूंचा खिसादेखील रिकामा झाला आहे.

आयसीसीने सार्वजनिक केलेल्या निवेदनात दोन्ही संघांवर मॅच फीच्या 40-40 टक्के दंडाची घोषणा केली. सामन्यादरम्यान तीनही पंचांच्या तक्रारीवरून सामनाधिकारी जेफ क्रो यांना दोन्ही संघ निर्धारित वेळेपेक्षा २-२ षटके मागे असल्याचे आढळले. त्या निवेदनात लिहिले आहे की,

“खेळाडू आणि त्यांच्या सहाय्यक कर्मचार्‍यांसाठी षटकांची गती योग्य न राखल्याने आयसीसी आचारसंहितेच्या कलम 2.22 नुसार, खेळाडूंना मॅच फीच्या 20 टक्के दंड आकारला जातो. दोन्ही कर्णधारांनी आपली चूक मान्य केली असून, त्यांना दंड ठोठावण्यात आला आहे, त्यामुळे औपचारिक सुनावणीची गरज नाही.”
मागील काही काळापासून अनेक संघ सातत्याने षटकांची गती योग्य राखत नसल्याने आयसीसीने नियम केला होता की, जर कोणताही संघ निर्धारित वेळेत षटके पूर्ण करू शकला नाही, तर त्याला उरलेल्या षटकात ३० यार्डच्या बाहेरील एक क्षेत्ररक्षक कमी करावा लागेल.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या –
‘टीम इंडिया कार्तिकवर अन्याय करतेय!’ माजी दिग्गजाचा खळबळजनक दावा
रैनाच्या गोंडस मुलाची ‘भारी’ बॅटिंग! क्युट व्हिडिओ पाहून चाहते म्हणाले…
धक्कादायक! भारतीय चाहत्याला जीवे मारण्याची धमकी; भारत-पाक सामन्यात केलेली ही कृती

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---