मुंबई इंडियन्स ज्युनियर आंतरशालेय क्रिकेट स्पर्धेत आज नागपूर टप्प्यात तुफान फटकेबाजी पाहायला मिळाली. आर्यन सेलोकर आणि आर्यन पार्धी यांनी वादळी खेळी करताना शतक झळकावले. त्यांच्या या खेळीच्या जोरावर दी साऊथ पब्लिक स्कूल संघाने १६ वर्षांखालील मुले गटात जीएच रैसोनी सीबीएसई संघावर ३३५ धावांनी विजय मिळवला.
१६ वर्षांखालील मुले गटात प्रथम फलंदाजी करताना दी साऊथ पब्लिक संघाने ३७ षटकांत २ बाद ३९९ धावांचा डोंगर उभा केला. आर्यन सेलोकरने १०० चेंडूंत १७९ धावा कुटल्या. त्याला आर्यन पार्धीच्या १३७ धावांची सुरेख साथ लाभली. प्रत्युत्तरात जीएच रैसोनी सीबीएसई संघाचा डाव११.५ षटकांत ६४ धावांवर गडगडला.
नागपूर टप्प्यातील १४ वर्षांखालील मुले गटात सोमलवार हायस्कूल संघाने १२० धावांनी दिल्ली पब्लिक स्कूल संघावर दणदणीत विजय साजरा केला. श्रेयस म्हैसकरने ६ विकेट्स घेत संघाला मोठा विजय मिळवून दिला.
नागपूर टप्प्यात १६ वर्षांखालील मुली गटात श्री राजेंद्र हायस्कूल संघाने १९ षटकांत ४ बाद ३६० धावांचा एव्हरेस्ट उभा केला. गुरुप्रीत बत्रा (68) आणि निहारी कावळे (५६*) यांनी अर्धशतकी खेळी केली. प्रत्युत्तरार जोसेफ कॉन्व्हेट गर्ल्स स्कूल संघाला २३ षटकांत ५ बाद २१० धावा करता आल्या. ४३ चेंडूंत नाबाद ५६ धावा आणि १ विकेट घेणाऱ्या निहारीला सर्वोत्तम खेळाडूचा मान मिळाला.
मुंबई टप्प्यातील १६ वर्षांखालील मुले गटात आराध्य मयेकरच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल संघाने दादरच्या शारदाश्रम विद्यामंदिर संघावर ५ विकेट्स राखून विजय मिळवला. प्रथम फलंदाजी करताना शारदाश्रम संघाला १४४ धावा करता आल्या. ऑक्सफर्ड संघाने हे लक्ष्य
३७.३ षटकांत ५ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले. आराध्य मयेकरने ९९ चेंडूंत नाबाद ७४ धावा आणि १ विकेट्स व १ निर्धाव षटक अशी अष्टपैलू कामगिरी केली.
१४ वर्षांखालील मुले गटात रायन इंटरनॅशनल स्कूल ( चेंबूर) संघाने माटुंग्याच्या एसआयईएस हायस्कूल संघाला ११ षटकांत ४० धावांत गुंडाळले. विवान संघानीने ६ विकेट्स घेतल्या. रायन संघाने हे माफक लक्ष्य ६.३ षटकांत २ फलंदाजांच्या मोबदल्यात पार केले.
संक्षिप्त धावफलक
मुंबई
१६ वर्षांखालील मुले
अंजुमन ए इस्लाम इंग्लिश स्कूल ( वाशी) १३ षटकांत ४ बाद ८० ( उमर मुजावर २४*, साहिल शेख १९*) वि. वि. सेंट स्टॅनीस्लॉस हायस्कूल ( वांद्रे) २५.२ षटकांत सर्वबाद ७६; सामनावीर – अंकित यादव ( ५ विकेट्स)
सेव्हन स्क्वेअर अकादमी ( मिरारोड) २४.४ षटकांत ५ बाद १३९( आदित्य कश्यप ४२, क्षितिज शिंदे ३२*) वि. वि. सेंट ॲलॉयसिस हायस्कूल २५.१ षटकांत सर्वबाद १३८; सामनावीर – आदित्य कश्यप ( ४२ धावा आणि ३ विकेट्स)
आयईएस न्यू इंग्लिश स्कूल ( वांद्रे) १०.५ षटकांत ३ बाद ५७ ( हृषीकेश गोरे २८*, ओमकार पाटणकर १२) वि. वि. बालमोहन विद्यामंदिर ३१.४ षटकांत सर्वबाद ५६; सामनावीर – अगस्थ्य बंगेरा ( ३ विकेट्स)
आरव्ही नेरकर सेकंडरी स्कूल ( वसई) २८.५ षटकांत ६ बाद ११५ ( रितिश पाटील ३६*, तनिष मेहर २६) वि. वि. श्रीमती सुलोचनादेवी सिंघानिया स्कूल ( ठाणे) २६.१ षटकांत ६ बास ११४; सामनावीर- रितिश पाटील ( ३६* धावा)
सेंट ॲने कॉन्व्हेंट स्कूल ( वसई) १४.५ षटकांत १ बाद ९९ ( मोहित बिस्त ४१*, शाहबाज खान ३८*) वि. वि. सरस्वती विद्यालय ( ठाणे) ३० षटकांत सर्वबाद ९८; सामनावीर – मोहित बिस्त ( २१ चेंडूंत नाबाद ४१ धावा आणि ३ विकेट्स)
एसव्हीएसएम जेव्ही पारेख ( विलेपार्ले) ३१.१ षटकांत सर्वबाद १३२ ( स्वयम डिंगोरीया ३०, देवम पारेख २०) वि. वि. होली क्रॉस ( लोवर परेल) ३७.५ षटकांत सर्वबाद ११९; सामनावीर- देवम पारेख ( २० धावा आणि २ विकेट्स)
ट्री हाऊस स्कूल ( विरार) ३९.२ षटकांत सर्वबाद १४५ ( जस उपाध्याय ४७, अक्षय चौरसिया २६) वि. वि. छत्रभूज नर्सी स्कूल ( विलेपार्ले) ३५ षटकांत सर्वबाद १२८ ; सामनावीर- अरपीत अग्रहरी ( ३ विकेट्स आणि १ निर्धाव षटक)
ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल ३७.३ षटकांत ५ बाद १४५ ( आराध्य मयेकर ७४*, भविष्य गायकवाड २०) वि. वि. शारदाश्रम विद्यामंदिर ( दादर) ३८.४ षटकांत सर्वबाद १४४; सामनावीर- आराध्य मयेकर ( ९९ चेंडूंत नाबाद ७४ धावा आणि १ विकेट्स व १ निर्धाव षटक)
१४ वर्षांखालील मुले
रायन इंटरनॅशनल स्कूल ( चेंबूर) ६.३ षटकांत २ बाद ४३ ( रिषी अय्यर १४, आर्यन शर्मा ९*) वि. वि. एसआयईएस हायस्कूल( माटुंगा) ११ षटकांत सर्वबाद ४०; सामनावीर – विवान संघानी ( ६ विकेट्स)
एनकेईएस हायस्कूल ( वडाळा) १९ षटकांत ३ बाद ८० ( ओमकार नाईक १३*, स्वराज वार्घट १३) वि. वि. विब्ग्योर हायस्कूल ( खारघर) २५ षटकांत सर्वबाद ७७; सामनावीर- ओमकार नाईक ( ३ विकेट्स आणि नाबाद १३ धावा)
व्हीपीएम विद्यामंदिर ( दहिसर) ८.५ षटकांत १ बाद ६१ ( श्रेयस सामंत २१*, अथर्व लाड १९*) वि. वि. दादर पारसी युथ असेंब्ली स्कूल १९.३ षटकांत सर्वबाद ५९; सामनावीर- मेघल सोलंकी ( ४ विकेट्स)
डॉ. ॲंटोनियो डीसिल्व्हा ( दादर) १२.३ षटकांत १ बाद ७९ ( साहिल नाखवा ४१*, लिखित कदम २१*) वि. वि. हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल ( अंधेरी) २४.२ षटकांत सर्वबाद ७५; सामनावीर- सुमीत खेडेकर ( ३ विकेट्स आणि ३ निर्धाव षटके)
साने गुरुजी विद्यालय ( दादर) ४० षटकांत ८ बाद २१९ ( स्वानिक वाघधरे ५८*, वरद केणी २७) वि. वि. छत्रभुज नर्सी स्कूल ( कांदिवली) २६.१ षटकांत सर्वबाद १२०; सामनावीर- तेजस जोशी (५ विकेट्स)
रायन इंटरनॅशनल स्कूल ( कांदिवली) ३३ षटकांत ९ बाद १८४ ( सोहम गुप्ता ६३*, नील जोगाणी ३६) वि. वि. रुस्तोमजी इंटरनॅशनल स्कूल ( दहिसर) ३७ षटकांत ९ बाद १८३; सामनावीर- सोहम गुप्ता ( नाबाद ६३ धावा)
१६ वर्षांखालील मुली
वसंत विहार हायस्कूल ( ठाणे) २३ षटकांत ७ बाद २१७ ( सोनाली गोडे ४६, कुंजल घाडगे ३३) वि. वि. ऑक्सफर्ड पब्लिक स्कूल ( कांदिवली) १८ षटकांत सर्वबाद ९६; सर्वोत्तम खेळाडू- कुंजल घाडगे ( ३३ धावा)
नागपूर
१६ वर्षांखालील मुले
श्री राजेंद्र हायस्कूल ११.२ षटकांत १ बाद १०२ ( सात्विक हतुळकर ५४*, अनिकेत अस्कर ३३) वि. वि. जैम हेरीटेज स्कूल २५.५ षटकांत सर्वबाद ९९; सामनावीर- सात्विक हतुळकर ( नाबाद ५४ धावा)
भवन्स विद्यामंदिर ( अष्टी) ३८.१ षटकांत ८ बाद १७४ ( शिखर रंधीर ५२, एम. एनाम शेख ३५) वि. वि. जैन इंटरनॅशनल स्कूल १४ षटकांत सर्वबाद ७७; सामनावीर – ओम चार्जन ( ५ विकेट्स)
गायकवाड पाटील इंटरनॅशनल स्कूल ४ बाद ८० धावा ( स्वयश जैस्वाल २१*, कृष्णा पिसे १७) वि. वि. मुंडले इंग्लिश मीडियम स्कूल सर्वबाद ७९; सामनावीर – प्रशांत अघाव (३ विकेट्स)
दी साऊथ पब्लिक ३७ षटकांत २ बाद ३९९ ( आर्यन सेलोकर १७९,आर्यन पार्धी १३७) वि. वि. जीएच रैसोनी सीबीएसई ११.५ षटकांत सर्वबाद ६४; सामनावीर – आर्यन सेलोकर ( १०० चेंडूंत १७९)
१४ वर्षांखालील मुले
भवन्स बीपी विद्यामंदिर ( अष्टी) १.४ षटकांत बिनबाद २७( चेतन मीना २३*) वि. वि. नारायणम विद्यालयम ( कोराडी रोड) सर्वबाद २६; सामनावीर – रिषभ ओबेरॉय ( ४ विकेट्स आणि १ निर्धाव षटक)
भवन्स बीपी विद्यामंदिर २.२ षटकांत २ बास ३२ ( पार्थ घोडे १५*, तरुण्य एमोरीकर ८*) वि. वि. सोमलवार हायस्कूल सर्वबाद २९; सामनावीर – लक्ष्य केवलरामणी (२ विकेट्स)
राजेंद्र हायस्कूल बिनबाद ६० ( यश गुप्ता ३०*, आर्यन मुंडे २७*) वि. वि. स्कूल ऑफ स्कॉलर सर्वबाद ५९; सामनावीर – यश गुप्ता ( नाबाद ३० धावा आणि ३ विकेट्स व २ निर्धाव षटके)
सोमलवार हायस्कूल ९ बाद २०१ ( सिधार्थ नागराळे ४९; यश कितुकळे ३७) वि. वि. दिल्ली पब्लिक स्कूल सर्वबाद ८१; सामनावीर- श्रेयस म्हैसकर ( ६ विकेट्स)
१६ वर्षांखालील मुली
श्री राजेंद्र हायस्कूल १९ षटकांत ४ बाद ३६०( गुरुप्रीत बत्रा 68, निहारी कावळे ५६*) वि. वि. जोसेफ कॉन्व्हेट गर्ल्स स्कूल २३ षटकांत ५ बाद २१०; सर्वोत्तम खेळाडू – निहारी कावळे ( ४३ चेंडूंत नाबाद ५६ धावा आणि १ विकेट)
सिद्धेश्वर विद्यालय १ बाद ८९ ( राशी चवारीया १६, एकता बोबडे १४*) वि. वि. पोदार इंटरनॅशनल सर्वबाद ८९; सर्वोत्तम खेळाडू – आरजू शिवणकर ( ६ विकेट्स)