पुणे : मॉडर्न पेंटॅथलॉनच्या आठव्या राष्ट्रीय अजिंक्यपद स्पर्धेत उद्घाटनाचा दिवस गाजविणा-या यजमान महाराष्ट्राच्या खेळाडूंचा अपेक्षेप्रमाणे दुस-या दिवशीही बोलबाला कायम राहिला.स्पेनमध्ये होणा-या जागतिक बायथले आणि ट्रायथले स्पर्धेसाठी भारताचा संघ या स्पर्धेतून निवडला जाणार असल्यामुळे या स्पर्धेला वेगळे महत्त्व प्राप्त झाले आहे.
म्हाळुंगे बालेवाडी येथील श्री शिवछत्रपती क्रीडा संकुलात सुरू असलेल्या या स्पर्धेत वरिष्ठ गटात पुरूषांमध्ये महाराष्ट्राच्या ओंकार कुचिकने २०० मीटर जलतरण आणि १६०० मीटर धावणे प्रकारात १७ मिनिटे १४.१४ सेंकद वेळेसह प्रथम क्रमांक पटकाविला. महराष्ट्राचा नाथूराम सुर्यवंशी (१८ मिनिटे ५६.६७ सें.)उपविजेता ठरला, तर उत्तर प्रदेशच्या सुधीर शर्माला (२० मिनिटे १८.७९ सें.) तिस-या क्रमांकावर समाधान मानावे लागले. कनिष्ठ गटात महाराष्ट्राच्या अजिंक्य बालवडकरने १४ मिनिटे ३४ सेंकद वेळेसह अव्वल स्थान पटकावले. सौरभ पाटील व सुरज रेणूसे अनुक्रमे दुस-या व तिस-या स्थानी राहिले.
युवा ‘अ’ गटात मुलांच्या शर्यतीतही २०० मीटर जलतरण व १६०० मीटर धावणे हाच प्रकार होता. यात महाराष्ट्राच्या यश जाधवने १४ मिनिटे ४८.९६ सेंकद वेळेसह प्रथम क्रमांकावर हक्क सांगितला, तर त्याचाच राज्य सहकारी निखिल मिसाळ (१६ मिनिटे ४.६९ सें.) दुस-या स्थानी राहिला. उत्तर प्रदेशच्या दिशांक सैनीने (१६ मिनिटे ५८.२३सें.) तृतीय क्रमांक पटकाविला.
* इतर निकाल :
= मुली (२०० मीटर जलतरण व १६०० मीटर धावणे) : नयना बोरकर – १७ मिनिटे १.२४सें. (महाराष्ट्र), अहिल्या चव्हाण – १७ मिनिटे ७.४२सें. (महाराष्ट्र), आस्था ठाकर – १७ मिनिटे १२.२८सें. (गुजरात).
युवा ‘ब’ गट मुली (२०० मीटर जलतरण व १२०० मीटर धावणे) : आदिती पाटील – १४ मिनिटे १९.९७सें., स्वरूपा रावस – १५ मिनिटे ८.२३सें., साक्षी सली – १५ मिनिटे ५०.२३सें. (सर्व महाराष्ट्र).
युवा ‘क’ गट मुली (१०० मीटर जलतरण व ८०० मीटर धावणे) : जुई घम – ८ मिनिटे १३.१२सें., मानसी मोहिते – ९ मिनिटे ७.११सें., गौरी चव्हाण – ९ मिनिटे ३४.१४सें. (सर्व महाराष्ट्र).
युवा ‘ड’ गट मुली (५० मीटर जलतरण व ४०० मीटर धावणे) : मुग्धा वाव्हळ – ४ मिनिटे १४.४२सें., वैभवी देसाई – ४ मिनिटे १६.४५सें., मनाली रत्नोजी – ४ मिनिटे २२.८०सें. (सर्व महाराष्ट्र).
युवा ‘ई’ गट मुली (५० मीटर जलतरण व ४०० मीटर धावणे) : वैष्णवी आहेर – ४ मिनिटे १३.९८सें., रूजुला कुलकर्णी – ४ मिनिटे ५३.९९सें., मैथीली चिटणीस – ५ मिनिटे ३.३८सें. (सर्व महाराष्ट्र).
युवा ‘फ’ गट मुली (५० मीटर जलतरण व २०० मीटर धावणे) : कायल पीएस – ३ मिनिटे ५२.४७सें. (पॉण्डेचेरी), श्रावणी निलवर्णा – ३ मिनिटे ५३.२६ सें. (महाराष्ट्र), मिहिका सुर्वे – ३ मिनिटे ५३.४६सें. (महाराष्ट्र).
= मुले :-
युवा गट (१०० मीटर जलतरण व ८०० मीटर धावणे) : सिद्धांत पातकी – ७ मिनिटे ८.३१ से. (महाराष्ट्र), सुनील ठाकर – ७ मिनिटे ३२.४४ सें. (राजस्थान), शिवतेज पवार – ७ मिनिटे ३४.६१ सें. (महाराष्ट्र).
युवा ‘ड’ गट मुले (५० मीटर जलतरण व ४०० मीटर धावणे) : प्रतिक बंग – ४ मिनिटे ८.६५सें. (महाराष्ट्र), पलाश ठाकूर – ४ मिनिटे २७.४२सें. (महाराष्ट्र), लोकेश बाबेरवाल – ४ मिनिटे ३२.३२सें. (राजस्थान).
युवा ‘इ’ गट मुले (५० मीटर जलतरण व ४०० मीटर धावणे) : आर्य चव्हाण – ४ मिनिटे २६.८४सें., अबीर धोंड – ४ मिनिटे २९.७७सें., नील वैद्य – ४ मिनिटे ३०.८सें. (सर्व महाराष्ट्र).