क्रिकेटमध्ये जो खेळाडू गोलंदाजी व फलंदाजी करतो, त्याला अष्टपैलू खेळाडू म्हटले जाते. काही खेळाडू जवळपास सगळ्या सामन्यात दुहेरी भूमिका निभावतात. काही खेळाडू हे केवळ फलंदाज किंवा गोलंदाज असतात. काही खेळाडू हे यष्टीरक्षक फलंदाज असतात.
असे अनेक खेळाडू आहेत, ज्यांनी फलंदाजीत चांगला कामगिरी केली आहे, परंतु क्वचित गोलंदाजीची संधी मिळाल्यावर त्यातही चमक दाखवली आहे. वनडेत तर कमजोर संघ समोर असले तर कधीही गोलंदाजी न करणारे फलंदाज एखादे- दुसरे षटक आरामात गोलंदाजी करतात.
एखाद्या सामन्यात पुर्णवेळ यष्टीरक्षकाची जबाबदारी पार पाडताना धोनीनेही २ सामन्यात गोलंदाजी केली आहे. तंतेदा तैबु या झिंबाब्वेच्या कर्णधाराने तर यष्टीरक्षक असताना २ सामन्यात १४ षटके गोलंदाजी केली आहे.
परंतु असे काही खेळाडू झाले आहेत, ज्यांनी २०० पेक्षा अधिक वनडे सामने खेळून कधीही गोलंदाजी केली नाही. वनडे क्रिकेट खेळलेल्या खेळाडूंपैकी ७१६ खेळाडूंनी कधीही एकही चेंडू गोलंदाजी केलेली नाही.
या लेखात आपण वनडेतील असे खेळाडू पाहणार आहोत, ज्यांनी २०० पेक्षा जास्त वनडे खेळले आहेत परंतु कधीही गोलंदाजी केली नाही. यातील बहुतांश खेळाडू हे यष्टीरक्षक आहे. परंतु यातील सर्वात आश्चर्यकारक नाव म्हणजे हर्षेल गिब्ज. या महान खेळाडूने कधीही वनडेत गोलंदाजी केली नाही.
याचबरोबर श्रीलंकेचा उपुल थरंगा तसेच इंग्लंडचा कर्णधार, ऑयन माॅर्गन यानेही वनडेत कधीही गोलंदाजी केली नाही.
भारतीय खेळाडूंमध्ये नयन मोगिंया (१४० वनडे), शिखर धवन (१३६ वनडे), मोहम्मद कैफ (१२५ वनडे), दिनेश कार्तिक (९४ वनडे), किरण मोरे (९४ वनडे) व अजिंक्य रहाणे (९० वनडे) यांनी कधीही गोलंदाजी केली नाही.
वनडेत २०० सामने खेळून कधीही एकही चेंडू गोलंदाजी न करणारे खेळाडू
कुमार संगकारा, सामने- ४०४
मार्क बाऊचर, सामने- २९५
एॅडम गिलख्रिस्ट, सामने- २८७
ब्रेंडन मॅक्क्युलम, सामने- २६०
हर्षेल गिब्ज, सामने- २४८
ऑयन माॅर्गन, सामने- २३६
उपुल थरंगा, सामने- २३५
मोईन खान, सामने- २२९
मुशफिकूर रहिम, सामने- २१८
वाचा- पाकिस्तान संघाला वनडेत धु- धु धुणारे ३ भारतीय क्रिकेटर्स