इंडियन प्रीमियर लीग २०२२ (IPL 2022) स्पर्धा सुरू व्हायला अवघे काही दिवस शिल्लक राहिले आहेत. ही स्पर्धा सुरू होण्यापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी बेंगलोरमध्ये खेळाडूंचा मेगा लिलाव (Ipl mega auction) पार पडणार आहे. या स्पर्धेसाठी सर्व १० संघांनी ३३ खेळाडूंना रिटेन केले आहे. तसेच मेगा लिलावासाठी १२०० पेक्षा जास्त खेळाडूंनी नाव नोंदणी केली आहे. दरम्यान या १२०० खेळाडूंमध्ये ५ असे खेळाडू आहेत, ज्यांना सर्व संघ आपल्या संघात स्थान देण्याच्या प्रयत्नात असणार आहे.
१) डेविड वॉर्नर (David Warner) : ऑस्ट्रेलिया संघाचा दिग्गज फलंदाज डेविड वॉर्नरने गतवर्षी सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व केले होते. परंतु, १४ व्या हंगामात साजेशी कामगिरी करण्यात अपयशी ठरल्यामुळे त्याचे कर्णधारपद काढून घेण्यात आले होते. इतकेच नव्हे, तर त्याला प्लेइंग ईलेव्हेनमधून देखील बाहेर केले होते. पुढील हंगामासाठी सनरायझर्स हैदराबाद संघाने त्याला रिलीज केले आहे. आगामी हंगामासाठी कोलकाता नाईट रायडर्स, पंजाब किंग्ज आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाला फलंदाजासह कर्णधाराची देखील गरज आहे. त्यामुळे हे संघ त्याला आपल्या संघात स्थान देण्याच्या प्रयत्नात असू शकतात.
२) श्रेयस अय्यर (Shreyas Iyer): श्रेयस अय्यरच्या नेतृत्वाखाली दिल्ली कॅपिटल्स संघाने आयपीएल २०२० स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता. परंतु, आयपीएल २०२१ स्पर्धा सुरू होण्यापूर्वी तो दुखापतग्रस्त झाला होता. ज्यामुळे रिषभ पंतला या संघाचे कर्णधारपद देण्यात आले होते. आगामी हंगामात देखील रिषभ पंत दिल्ली कॅपिटल्स संघाचे नेतृत्व करताना दिसून येणार आहे. त्यामुळे रिषभ पंतने दिल्ली कॅपिटल्स संघ सोडण्याचा निर्णय घेतला होता. आता आगामी हंगामात त्याच्यावर मोठी बोली लागू शकते.
३) क्विंटन डी कॉक (Quinton dekock):गेल्या काही वर्षांपासून मुंबई इंडियन्स संघाचे प्रतिनिधित्व करत असलेल्या क्विंटन डी कॉकला आगामी हंगामासाठी रिलीज करण्यात आले आहे. त्याला मुंबई इंडियन्स संघाने रिटेन केले नसले, तरीदेखील इतर संघ त्याच्यावर लक्ष केंद्रित करून असणार आहेत. क्विंटन डी कॉक हा टी२० क्रिकेटमधील विस्फोटक फलंदाजांपैकी एक आहे. त्याने आतापर्यंत ४ शतक आणि ४४ अर्धशतक केले आहेत.
४) ईशान किशन (Ishan kishan) : मुंबई इंडियन्स संघाचा डाव्या हाताचा फलंदाज ईशान किशनला देखील आगामी हंगामासाठी रिलीज करण्यात आले आहे. आयपीएल स्पर्धेत केलेल्या अप्रतिम कामगिरीच्या जोरावर त्याने भारतीय संघात स्थान मिळवले होते. त्याने आतापर्यंत टी२० क्रिकेटमध्ये २ शतक आणि १५ अर्धशतक झळकावले आहेत.
५) शिखर धवन (Shikhar Dhawan) : डाव्या हाताचा विस्फोटक फलंदाज शिखर धवन याने आतापर्यंत आयपीएल स्पर्धेत अप्रतिम कामगिरी केली आहे. आगामी हंगामासाठी दिल्ली कॅपिटल्स संघाने त्याला रिलीज केले आहे. पृथ्वी शॉ आणि शिखर धवन यांच्या जोडीने दिल्ली कॅपिटल्स संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. सर्व संघ अनुभवी आणि विस्फोटक सलामीवीर फलंदाजाच्या शोधात असणार आहे. त्यामुळे शिखर धवनवर मोठी बोली लागू शकते.
महत्वाच्या बातम्या :
वेस्ट इंडिज विरुद्ध रोहित करणार नेतृत्त्व; कोण होणार संघात इन आणि कोण होणार आऊट? वाचा सविस्तर
हे नक्की पाहा: