---Advertisement---

IPL Auction 2022 | विश्वविजेत्या टीम इंडिया U19 संघातील १० खेळाडू मेगा लिलावात सामील, वाचा नावे

On: शुक्रवार, फेब्रुवारी 11, 2022 10:30 PM
ind u192022
---Advertisement---

जगातील सर्वात मोठी व्यवसायिक टी२० लीग असलेल्या इंडियन प्रीमियर लीगचा (IPL 2022) आगामी हंगाम सुरू होण्यास दोन महिन्यांपेक्षा कमी कालावधी शिल्लक राहिला आहे. तत्पूर्वी, या आयपीएल हंगामासाठी बेंगलोर येथे १२ व १३ फेब्रुवारी रोजी मेगा लिलाव (IPL Mega Auction) पार पडणार आहे. या मेगा लिलावासाठी काही तासांचा अवधी शिल्लक असतानाच, भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (बीसीसीआय) व‌ आयपीएल गव्हर्निंग कौन्सिलने नुकताच एकोणीस वर्षाखालील मुलांचा क्रिकेट विश्वचषक जिंकणाऱ्या भारतीय संघातील १० खेळाडूंना आनंदाची बातमी दिली आहे.

त्या खेळाडूंचा केला गेला लिलावात समावेश

आयपीएलच्या मेगा लिलावासाठी तब्बल १२०० खेळाडूंनी नोंदणी केली होती. त्यातील ५९० खेळाडूंना अंतिम यादीसाठी निवडले गेले. या मेगा लिलावासाठी अवघे काही तास शिल्लक असताना आयपीएल चेअरमन ब्रिजेश पटेल यांनी यामध्ये आणखी दहा खेळाडूंचा समावेश करत असल्याची माहिती दिली. हे सर्व खेळाडू नुकत्याच झालेल्या एकोणीस वर्षाखालील मुलांच्या विश्वचषकात विजय मिळवणाऱ्या भारतीय संघाचे सदस्य आहेत.

म्हणून खेळाडूंचा नव्हता यादीत समावेश

आयपीएलच्या नियमानुसार, कमीत कमी एक देशांतर्गत क्रिकेटचा सामना खेळणाऱ्या खेळाडूंनाच लिलावासाठी नाव नोंदणी करता येणार होती. विश्वचषक विजेत्या संघातील १० खेळाडू असे होते ज्यांनी यापूर्वी एकही प्रथमश्रेणी अथवा लिस्ट ए सामना खेळला नव्हता. मात्र, विश्वचषक जिंकल्यानंतर या खेळाडूंना लिलावात सहभागी करून घ्यावे अशी मागणी समोर आली होती

या खेळाडूंना होणार फायदा

या नव्याने लिलावासाठी उपलब्ध असणाऱ्या खेळाडूंमध्ये विश्वचषक विजेत्या संघाचा उपकर्णधार शेख राशीद,‌ विजयी षटकार मारणारा यष्टीरक्षक दिनेश बाणा, वेगवान गोलंदाज रवी कुमार, सलामीवीर अंगक्रिश रघुवंशी, अष्‍टपलू निशांत सिंधू, मानव पारेख, वेगवान गोलंदाज गर्व सांगवान, आराध्य यादव व सिद्धार्थ यादव यांचा समावेश असेल. बीसीसीआयने अद्याप या खेळाडूंची नावे अधिकृतरीत्या जाहीर केली नाहीत. या खेळाडूंच्या समावेशामुळे आता मेगा लिलावात एकूण ६०० खेळाडूंवर बोली लागेल.

महत्वाच्या बातम्या-

कायरन पोलार्ड हरवला! ब्रावोने केले शोधून देण्याचे आवाहन

भारतीय क्रिकेटच्या भविष्यासाठी पॉंटिंगने घेतली ‘या’ तिघांची नावे 

महत्वाची बातमी! बीसीसीआय अध्यक्ष सौरभ गांगुली पुन्हा रुग्णालयात दाखल 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---