पुणे: एसेस टेनिस अकादमी यांच्या तर्फे आयोजित व एनरझरलचे निखिल राव प्रायोजित पीएमडीटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या पीएमडीटीए एसेस करंडक पुरुष टेनिस अजिंक्यपद स्पर्धेत शहरांतून 100 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. हि स्पर्धा एसेस टेनिस अकादमी, उंड्री या ठिकाणी 28 व 29 मे 2022 या कालावधीत होणार आहे.
स्पर्धा संचालक सुनील लुल्ला, होझेफा हकीम, तैझुण हकीम यांनी सांगितले की, स्पर्धेत रवी कोठारी, राहुल कोठारी, जॉय बॅनर्जी, अमित किंडो, सूर्या निंबाळकर, नरेंद्र पवार या मानांकित खेळाडूंचा सहभाग आहे. स्पर्धेतील विजेत्यांना करंडक व प्रशस्तीपत्रक व पीएमडीटीए गुण देण्यात येणार आहे. स्पर्धेसाठी सुधीर पिसाळ यांची मुख्य रेफ्री म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.
महत्त्वाच्या बातम्या-
‘भविष्यात हे नाव…’, एलिमिनेटर सामन्यात शतक ठोकणाऱ्या रजत पाटीदारबद्दल विराटचं मन जिंकणारं विधान
आयपीएलच्या झगमगाटात नवी कसोटी क्रमवारी जाहीर; रोहित-विराट-बुमराहला…
क्या मस्त खेला रे तू! विराटच्या नेत्रदिपक चौकाराचं गांगुली, जय शहाकडून कौतुक, रिऍक्शन कॅमेरात कैद