---Advertisement---

चार महिन्याने त्याने हातात बॅट पकडली आणि केले खणखणीत शतक

---Advertisement---

इंदोर । ऑस्ट्रेलिया विरुद्ध भारत तिसऱ्या वनडे सामन्यात आज ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर ऍरॉन फिंचने जबदस्त खेळी करताना शतक केले. १२५ चेंडूचा सामना करताना त्याने १२४ धावा केल्या. यात ५ षटकार आणि १२ चौकारांचा समावेश होता.

पण आपणास हे माहित नसेल की फिंच शेवटचा वनडे सामना इंग्लंड संघाविरुद्ध १० जून २०१७ रोजी खेळला होता. त्यानंतर या खेळाडूने कोणताही आतंरराष्ट्रीय सामना खेळाला नव्हता. विशेष म्हणजे त्या सामन्यातही या खेळाडूने ६८ धावा केल्या होत्या.

३१ वर्षीय फिंच ऑस्ट्रेलियाकडून ८३ वनडे आणि ३१ टी२० सामने खेळला आहे. त्यात त्याने ८ शतके वनडेत तर एक शतक टी२० मध्ये केले आहे.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment