---Advertisement---

ये जोडी हैं नंबर 1- हिटमॅन-गब्बर जोडीने मोडला सेहवाग- सचिन जोडीचा विक्रम

On: शनिवार, जानेवारी 26, 2019 3:36 PM
---Advertisement---

न्यूझीलंड विरुद्ध भारत यांच्यातील दुसरा वन-डे सामना माऊंट मॉनगनुई येथील बे ओव्हल मैदानावर सुरू आहे.

या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. या निर्णयाला भारताच्या फलंदाजांनी योग्य ठरवत न्यूझीलंडसमोर 325 धावांचे लक्ष ठेवले आहे.

रोहित शर्मा आणि शिखर धवन यांनी तुफानी फलंदाजी करत 154 धावांची भागीदारी केली. वन-डे क्रिकेटमध्ये सलामीला येत या दोघांनी आतापर्यंत 14 वेळा 100पेेक्षा अधिक धावांची भागीदारी करत सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवागच्या विक्रमाला मागे टाकले आहे.

सचिन-सेहवाग जोडीने वन-डे क्रिकेटमध्ये सलामीला येत 12वेळा 100पेेक्षा अधिक धावांची भागीदारी केली होती.

यावेळी रोहितने 9 चौकार आणि 3 षटकाराच्या मदतीने 96 चेंडूत 87 धावा केल्या. तर शिखरने 9 चौकारांच्या मदतीने 67 चेंडूत 66 धावा केल्या.

वन-डे क्रिकेटमध्ये सलामीला येत 100पेेक्षा अधिक धावांची भागीदारी –

21 वेळा – सचिन तेंडुलकर-सौरव गांगुली (भारत)

16 वेळा – मॅथ्यू हेडन-एडम गिलख्रिस्ट (ऑस्ट्रेलिया)

15 वेळा – सीजी ग्रीनीज- एमएल हायन्स (विंडीज)

14वेळा* – रोहित शर्मा-शिखर धवन (भारत)

12 वेळा – सचिन तेंडुलकर- विरेंद्र सेहवाग (भारत)

महत्त्वाच्या बातम्या-

कर्णधार रहाणेने केली ‘अजिंक्य’ खेळी…

शिखर धवनला सतावत आहे या गोष्टीची चिंता…

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment