ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सलामीवीर फलंदाज डेविड वॉर्नर सध्या अप्रतिम फॉर्ममध्ये आहे. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात तीन सामन्यांची वनडे मालिका शुक्रवारी (22 सप्टेंबर) सुरू झाली. मालिकेतील पहिल्याच सामन्यात वॉर्नरने अर्धशतक केले. तसेच वनडे क्रिकेटमध्ये आपले 100 षटकात देखील पूर्ण केले.
डेविड वॉर्नर (David Warner) ऑस्ट्रेलियासाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत सातव्या क्रमांकावर पोहोचला आहे. यादीत पहिला क्रमांकाव रिकी पाँटिंग (Ricky Ponting) याचा आहे. पाँटिंगने आपल्या वनडे कारकिर्दीत ऑस्ट्रेलियासाठी सर्वाधिक 159 षटकात मारले आहेत. दुसऱ्या क्रमांकावर ऍडम गिलस्क्रिस्ट आहे, ज्याने वनडे क्रिकेटमध्ये 149 षटकार मारले आहेत.तिसऱ्या क्रमांकावर शेन वॉटस आहे, ज्याने 131 षटकारांसह वनडे कारकिर्दीचा शेवट केला. ऍरॉन फिंच याने वनडे कारकिर्दीत 129 धावा केल्या आहेत. अष्टपैलू 128 षटकारांसह पाचव्या, तर अँड्र्यू सायमंड्स 103 षटकारांसह सहाव्या क्रमांकावर आहे.
शुक्रवारी (22 सप्टेंबर) भारताविरुद्धच्या पहिल्या सामन्यात वॉर्नरने एक षटकार मारताच 100 वनडे षटकार पूर्ण केले. वॉर्नरकडे अँड्र्यू सायमंड्सला मागे टाकण्याची संधी आहे. वॉर्नरने या सामन्यात 53 चेंडूत 52 धावांची महत्वपूर्ण खेळी केली आणि ऑस्ट्रेलियाला चांगली सुरुवात मिळवून दिली. (100 sixes in ODI cricket for David Warner. )
पहिल्या वनडेसाठी उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – शुबमन गिल, ऋतुराज गायकवाड, श्रेयस अय्यर, केएल राहुल (कर्णधार), इशान किशन, सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, आर अश्विन, शार्दुल ठाकूर, जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद शमी
ऑस्ट्रेलिया – डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्यूशेन, कॅमरून ग्रीन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू शॉर्ट, पॅट कमिन्स (कर्णधार), शॉन ऍबॉट, ऍडम झम्पा.
महत्वाच्या बातम्या –
बिग ब्रेकिंग! विश्वचषकासाठी पाकिस्तान संघाची घोषणा, हुकमी एक्का बाहेर; 15 महिन्यांनंतर ‘या’ धुरंधराचे कमबॅक
कशी आहे विराटची World Cupमधील कामगिरी? 2 वर्ल्डकपमध्ये ठोकलंय शतक, वाचा लेखाजोखा