---Advertisement---

भारताच्या ‘कुल-चा’ जोडीने विकेट्सची सेंचूरी केली पूर्ण

---Advertisement---

माऊंट मॉनगनुई| भारताचा न्यूझीलंड विरुद्ध तिसरा वनेड सामना बे ओव्हल मैदानावर पार पडला असून भारताने हा सामना 7 विकेट्सने जिंकला आहे. तसेच 5 सामन्यांच्या वनडे मालिकेत 3-0 अशी विजयी आघाडी घेतली आहे.

भारतीय संघासाठी फिरकीपटू कुलदिप यादव आणि युजवेंद्र चहल या जोडीने ऑस्ट्रेलिया उत्तम कामगिरी करत संघाच्या विजयामध्ये महत्त्वाची भुमिका पार पाडली आहे. तसेच ही जोडी त्यांचा चेंडूचा मारा कायम ठेवत न्यूझीलंड दौऱ्यातही चमकदार कामगिरी करत आहे.

कुल-चा या नावाने ओळखल्या जाणाऱ्या कुलदीप यादव-युजवेंद्र चहल या जोडीने एकत्र खेळताना वन-डे क्रिकेटमध्ये 100 विकेट्स टप्पा पूर्ण केला आहे.

आजच्या सामन्यात चहलने 2 विकेट्स घेतल्या असून न्यूझीलंडचा कर्णधार केन विलियमसनची विकेट ही कुलदीप-चहलच्या जोडीची 100वी विकेट ठरली आहे.

चहलने आत्तापर्यंत 38 वन-डे सामन्यात 68 विकेट्स घेतल्या आहेत. तर कुलदीपने 38 वन-डे सामन्यात 77 विकेट्स घेतल्या आहेत.

आजच्या सामन्यात कुलदीपला विकेट घेण्यात अपयश आले असले तरी त्याने मागील दोन सामन्यात प्रत्येकी चार विकेट्स घेतल्या आहेत. यामुळे तो न्यूझीलंडमध्ये सलग दोन वन-डे सामन्यात चार किंवा चार पेक्षा अधिक विकेट्स घेणारा पहिलाच फिरकीपटू ठरला होता.

चहलने ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शेवटच्या वन-डे सामन्यात सर्वोत्तम गोलंदाजी करताना 10 षटकात 42 धावा देत 6 विकेट्स घेतल्या होत्या. त्यावेळी तो ऑस्ट्रेलियामध्ये एका वनडे सामन्यात 6 विकेट्स घेणारा दुसराच भारतीय गोलंदाज ठरला होता.

न्यूझीलंड विरुद्धच्या चालू मालिकेतील 3 सामन्यांमध्ये चहलने 6 तर कुलदीपने 8 विकेट्स घेतल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

अंबाती रायडूला मोठा धक्का, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये करू शकणार नाही गोलंदाजी

हिटमॅन रोहित शर्माने केली एमएस धोनीच्या विक्रमाची बरोबरी

रोहित-कोहलीची जोडी हिट, केला हा मोठा पराक्रम

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---

Leave a Comment