क्रीडाजगतातून मोठी बातमी समोर येत आहे. देश- परदेशात आपल्या कामगिरीचा डंका वाजवलेल्या दिग्गज ऍथलिट मान कौर यांचे निधन झाले आहे. त्या १०५ वर्षांच्या होत्या. त्यांनी शनिवारी (३१ जुलै) दुपारी जवळपास १ वाजता त्यांनी पंजाबच्या डेराबस्सीमध्ये अखेरचा श्वास घेतला. त्या गाल ब्लेडर कँसरशी झुंज देत होत्या. त्यांच्यावर डेराबस्सी येथील शुद्धी आयुर्वेदा पंचकर्मा रुग्णालयात उपचार सुरू होते.
मान कौर यांच्या निधनाच्या एक तास आधी दुपारी १२ वाजता त्यांचा मुलगा गुरदेव सिंगने सांगितले होते की, त्या आता ठीक होत आहेत. त्याचबरोबर त्यांच्या पोटातील दुखणे कमी झाले आहे. आधी त्या आपल्या पायांना मागे- पुढे करू शकत नव्हत्या. मात्र, त्या आपल्या पायांना हलवत आहेत. खुर्चीवर बसता येत आहे, परंतु एक वाजता अचानक त्यांच्या मुलाने त्यांच्या निधनाची माहिती दिली. (105 Year Old Athlete Maan Kaurs Condition Improves Chief Minister Punjab Gave Financial Assistance of 5 Lakhs Now Taking Fruit Diet)
Saddened at the demise of iconic veteran #athlete #MaanKaur Ji, who passed away at the age of 105. A recipient of #NariShaktiPuraskar winning laurels for our country, she truly becomes a role model for all.#RIP pic.twitter.com/8KNqe72Mw4
— V P Singh Badnore (@vpsbadnore) July 31, 2021
नारी शक्ती पुरस्काराने गौरव
मान कौर यांनी राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर अनेक स्पर्धांमध्ये ३५ पेक्षाही अधिक पदके जिंकली होती. कोरोना व्हायरसपूर्वी त्या सातत्याने पदक जिंकून भारताची मान उंचावत राहिल्या. त्यांची कामगिरी पाहून मागील वर्षी महिला दिवस (८ मार्च) या खास दिवशी त्यांना नारी शक्ती पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. राष्ट्रपती भवनात सन्मान घेण्यासाठी मान कौर ज्या वेगाने स्टेजवर पोहोचल्या, ते पाहून राष्ट्रपतीही दंग झाले होते.
पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटल्यानंतर हात जोडून झाल्या होते नतमस्तक
नारी शक्ति पुरस्कार मिळाल्यानंतर सायंकाळी जेव्हा मान कौर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना भेटल्या, तेव्हा त्या हात जोडून नतमस्तक झाल्या होत्या. त्यांना पुन्हा एकदा भेटून मोदींनी आनंद व्यक्त केला. सोबतच त्यांचा आशीर्वादही घेतला. मान कौर यांनीही नरेंद्र मोदी यांना प्रगती करण्याचा आशीर्वाद दिला होता.
पंजाब शासनाने केली होती आर्थिक मदत
पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्याकडून त्यांना ५ लाख रुपयांचा चेक डीसी पटियालामार्फत मिळाला होता. याव्यतिरिक्त शिरोमणी अकाली दल (बादल)चे आमदार एन के शर्मा यांनीही त्यांना एक लाख रुपयांचा चेक रुग्णालयात येऊन दिला होता. दुसरीकडे मास्टर्स ऍथलिट असोसिएशननेही त्यांची आर्थिक मदत केली होती.
ऑलिंपिकशी संबंधित बातम्या-
-दोन वेळची पदक विजेती सीमा पुनियाने केला ६०.५७ मीटरचा डिस्कस थ्रो; मिळवला ‘हा’ क्रमांक