---Advertisement---

स्क्रिप्ट राइटर आहेस का? सूर्यकुमार यादवने पत्रकाराला दिले झक्कास प्रत्युत्तर!

---Advertisement---

मागच्या दिवसात डोमेस्टिक क्रिकेटमध्ये खूप गोष्टी बदलताना दिसत आहेत. काही मीडिया रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, यशस्वी जयस्वाल पुढच्या हंगामात मुंबई शिवाय गोवा क्रिकेट संघासाठी खेळताना दिसून येईल. त्यानंतर एक दुसरी अफवा पसरवण्यात आली की, सूर्यकुमार यादव सुद्धा मुंबई सोडून गोवा क्रिकेट टीम मध्ये सामील होऊ शकतो. पण भारताच्या टी20 कर्णधाराने या सर्व अफवांवर मौन सोडले आहे. तसेच त्याने पत्रकाराला मजेशीर अंदाजात फटकारले आहे.

गोवा क्रिकेट संघाला आत्ताच एलिट रणजी ट्रॉफी मध्ये प्रमोशन मिळाले आहे. याच कारणाने गोवा क्रिकेट असोसिएशन पूर्ण भारतातील खेळाडूंची संपर्क करत आहे. यामध्ये टाइम्स ऑफ इंडियाच्या एका रिपोर्टमध्ये दावा करण्यात आला आहे की, सूर्यकुमार यादव सुद्धा लवकरच डोमेस्टिक मुंबई संघ बदलून गोवा करू शकतो. या सुद्धा अफवा पसरवल्या की, सूर्या एकटाच नाही तर मुंबईच्या काही अनेक खेळाडूंना सोबत घेऊन तो गोवा क्रिकेट टीम मध्ये जाऊ शकतो.

या संबंधित सूर्यकुमार यादवने सोशल मीडिया पोस्टच्या माध्यमातून पत्रकारला सुनावले आहे. त्याने सोशल मीडियावर लिहिले की, पत्रकार आहे की स्क्रिप्ट रायटर? जर हसायचं असेल तर मी कॉमेडी चित्रपट बघणं सोडून असले आर्टिकल्स वाचायला सुरू करेन. एकदम बकवास.

द इंडियन एक्सप्रेस नुसार, यशस्वी जयस्वाल मुंबई सोडून गोवा क्रिकेट टीममध्ये जाण्याच मुख्य कारण म्हणजे, लीडरशिप जबाबदारी आहे. त्याने इंडियन एक्सप्रेसशी बोलताना म्हटले हा निर्णय माझ्यासाठी खूप कठीण आहे. मी आज जो काही आहे, ते सर्व मला मुंबईने दिले आहे. या शहराने मला एवढ्या मोठ्या उंचीवर पोहोचवले आहे. मी कायमच मुंबई क्रिकेट असोसिएशनचा आभारी असेल.

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---