---Advertisement---

संघात नसला म्हणुन काय झाले, जड्डूने या संघाकडून केला विक्रम

On: मंगळवार, नोव्हेंबर 13, 2018 5:19 PM
---Advertisement---

राजकोट | भारतीय संघातील अष्टपैलू खेळाडू रविद्र जडेजाने आज रणजी ट्राॅफी सामन्यात नाबाद शतकी खेळी केली आहे. सौराष्ट्र विरुद्ध रेल्वे सामन्यात जडेजाने ३२६ चेंडूत नाबाद १७८ धावा केल्या आहेत.

रेल्वेच्या पहिल्या डावातील २०० धावानंतर फलंदाजीला आलेल्या सौराष्ट्राने दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला तेव्हा ८ बाद ३४४ धावा केल्या आहेत. त्यातील १७८ धावा एकट्या जडेजाने केल्या आहेत.

त्याचे हे प्रथम श्रेणी क्रिकेटमधील १०वे तर रणजी ट्राॅफीमधील ८वे शतक ठरले. जडेजाने कसोटीत एक तर दुलिप ट्राॅफीमध्ये एक शतक केले आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment