इंडियन प्रीमिअर लीग 2023 स्पर्धेच्या साखळी फेरीनंतर पहिला क्वालिफायर सामना चेन्नई सुपर किंग्स वि. गुजरात टायटन्स संघात मंगळवारी (दि. 23 मे) खेळला जाणार आहे. हा सामना चेन्नईच्या चेपॉक स्टेडिअममध्ये पार पडणार आहे. गुजरात सलग दुसऱ्यांदा तर चेन्नई तब्बल 10 व्या वेळी जगातील या सर्वात मोठ्या लीग स्पर्धेचा अंतिम सामना खेळण्याचा प्रयत्न करेल. मात्र, चेन्नई संघाने या स्पर्धेत इतकी मोठी मजल मारताना अनेक दिग्गजांना मात्र खोटे ठरवले.
एमएस धोनी याच्या नेतृत्वातील चेन्नई सुपर किंग्स संघाने 14 सामने खेळताना 8 सामने जिंकले. तसेच, 17 गुणांसह दुसरे स्थान पटकावले. या संघात अनेक वरिष्ठ खेळाडूंचा समावेश असल्याने त्यांना पहिल्या दोन क्रमांकावर येण्यासाठी कोणी संधी दिली नव्हती. मात्र, उत्कृष्ट सांघिक कामगिरीच्या जोरावर त्यांनी दुसरा क्रमांक पटकावला.
आयपीएलचे थेट प्रक्षेपण करणाऱ्या प्रसारण वाहिनीने आयपीएलच्या आधी आपल्या 12 समालोचक व समीक्षकांना पहिल्या दोन क्रमांकावर कोणते संघ राहतील असे विचारले होते. त्यामध्ये प्रत्येकी सात समालोचकांनी रॉयल चॅलेंजर्स बंगलोर व राजस्थान रॉयल्स हे पहिल्या दोन मध्ये असतील असे म्हटलेले. मात्र, हे संघ प्ले ऑफसाठी पात्र ठरू शकले नाहीत. या व्यतिरिक्त प्रत्येकी पाच मते गुजरात टायटन्स व लखनऊ सुपरजायंट्स संघाच्या बाजूने होती. हे दोन्ही संघ अनुक्रमे पहिल्या व तिसऱ्या क्रमांकावर राहिले.
कोणीही पहिल्या दोन क्रमांकावर येण्याची संधी न दिलेल्या सीएसकेने आपल्या खेळाने या सर्वांना चोख उत्तर दिले. अंदाज व्यक्त करणाऱ्या समलोचकांमध्ये डेव्हिड हसी, जॅक कॅलिस, डॅरेन गंगा, टॉम मूडी, ऍरॉन फिंच, श्रीसंत, दीप दासगुप्ता, संजय मांजरेकर, संदीप पाटील, मिताली राज, इरफान पठाण व मोहम्मद कैफ यांचा समावेश होता.
(12 Commenter Proved Wrong After CSK Qualify For Play Offs Of IPL 2023)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
धोनीचा रागराग करणाऱ्यांना हार्दिकने दोनच शब्दात केले गार; म्हणाला, ‘तसंच करायचंय ना मग…’
धोनी, हार्दिक, ईशान आणि कृणाल पंड्याने केली पार्टी? मुंबई प्लेऑफमध्ये पोहोचताच व्हिडिओ व्हायरल