भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठी क्रिकेट हे खेळापेक्षाही अधिक महत्त्वाचे आहे. खेळाडू, त्यांचे वैयक्तिक जीवन, तसेच त्यांचा जीवन जगण्याचा अंदाज याबद्दल चाहत्यांना जाणून घेण्यात आनंद मिळतो. कधी कधी हे इथपर्यंतच थांबत नाही तर वैयक्तिक जीवनावरुन चाहते खेळाडूंना सोशल मीडियावर ट्रोलही करतात. हे निश्चितच चुकिचेही आहे.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये अनेक खेळाडू असे आहेत ज्यांनी वेगवेगळ्या कारणांनी दुसऱ्यांदा लग्न केले किंवा त्यांना करावे लागले. या लेखात आपण अशाच खेळाडूंची माहिती घेणार आहोत. Cricketers who married twice.
११. जाॅटी रोड्स
दक्षिण आफ्रिकेचा स्टार क्षेत्ररक्षक राहिलेल्या जाॅटी रोड्सचा पहिले लग्न हे १९ वर्ष टिकले. केट मॅकर्थीबरोबर १९ वर्ष संसार थाटल्यानंतर रोड्स आणि ती २०१३मध्ये वेगळे झाले. केट मॅकर्थी ही आफ्रिकेचे महान माजी क्रिकेटपटून कुयाॅन मॅकर्थी यांनी पुतणी होती. मेलानीबरोबर पुढे रोड्सने दुसरे लग्न केले. मुंबई इंडियन्सचा क्षेत्ररक्षक प्रशिक्षक असलेल्या रोड्सच्या मुलीचा जन्म मुंबईत झाला. भारताबद्दल असलेल्या प्रेमापोटी रोड्स दांपत्याने तिला इंडिया असे नाव दिले.
१०. वसिम अक्रम
पाकिस्तानचा महान कर्णधार वसिम अक्रमने दोन वेळा लग्न करण्याचं कारण अर्थातच त्याची पहिली पत्नी हुमा मुफ्तीचा आजाराने झालेला मृत्यु. ते १९९५ ते २००९ अशी चार वर्ष एकत्र राहिले. तिचा मृत्यु चेन्नई शहरात झाला. त्यानंतर वयाच्या ४८व्या वर्षी अक्रम पुन्हा लग्नाच्या बोहल्यावर चढला. पुढे ऑस्ट्रेलियामध्ये जनसंपर्क अधिकारी असलेल्या शानियरा थाॅंम्पनसन बरोबर त्याने २०१३मध्ये लग्न केले.
९. शोएब मलिक
पाकिस्तानचा अष्टपैलू खेळाडू व सध्या खेळत असलेल्या जगातील क्रिकेटपटूमध्ये सर्वात अनुभवी क्रिकेटर शोएब मलिकची सानिया मिर्झा ही दुसरी पत्नी आहे. शोएबने २००२मध्ये आयशी सिद्दीकी या महिलेशी लग्न केले होते. याचा खुलासा आयशानेच ‘जेव्हा शोएबने सानियाशी लग्न केले’ तेव्हा केला होता. तसेच त्यांच्याविरुद्ध केसही दाखल केली होती.
८. इम्रान खान
पाकिस्तानचे माजी विश्वविजेते कर्णधार व सध्याचे पंतप्रधान इम्रान खान यांनी तीन वेळा लग्न केले. त्यांचे पहिले लग्न हे जेमीमा गोल्डस्मिथ यांच्याबरोबर झाले होते. १९९५ ते २००४ या काळात हे जोडपे एकत्र राहिले. परंतु जेमीमा यांना पाकिस्तानात जुळवून घेताना कठीण जात होते. म्हणून हे जोडपे वेगळे झाले. त्यानंतर २०१५मध्ये इम्रान खान यांनी दुसऱ्यांदा रेहम खान या लिबीयात जन्माला आलेल्या पत्रकार महिलेशी लग्न केले व केवळ ९ महिन्यात त्यांचा घटस्फोट झाला. त्यानंतर २०१८मध्ये इम्रान खान तिसऱ्यांदा बोहल्यावर चढले. त्यांनी बुशरा बेबी यांच्याबरोबर लग्न केले.
७. ग्रॅमी स्मिथ
दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅमी स्मिथने दुसऱ्यांदा लग्न केले आहे. स्मिथने २ नोव्हेंबर २०१९ रोजी आपली प्रेयसी रोमी लॅनफ्रांचीशी लग्न केले. यापूर्वी ऑगस्ट २०११ मध्ये स्मिथने केप टाऊनमध्ये आयरिश गायक मॉर्गन डीनबरोबर लग्न केले होते. या दोघांनाही दोन मुले आहेत. तथापि, फेब्रुवारी २०१५ मध्ये या दोघांनीही घटस्फोट घेत असल्याचे जाहीर केले.
६. ब्रेट ली
ऑस्ट्रेलियाचा महान वेगवान गोलंदाज ब्रेट लीने ही दोन लग्न केली आहेत. २००२मध्ये ब्रेट ली एलिजाबेथ केंपबरोबर लग्न झाले. पुढे २ वर्षांनी हे जोडपे वेगळे झाले. त्याला पहिल्या पत्नीपासून एक पुत्ररत्नही प्राप्त झाले. तर २०१४ मध्ये ब्रेट ली पुन्हा बोहल्यावर चढला. त्याने लाना एंडरसन हिच्याशी २०१४मध्ये लग्न केले. त्यांना दोन मुले आहेत. पुढे उनिंदिन तन्निंस्था चटर्जीबरोबरही त्याचे नाव जोडले गेले होते.
५. योगराज सिंग
भारताकडून १ कसोटी व ६ वनडे सामने खेळलेले योगराज सिंग हे युवराज सिंगचे वडिल म्हणून क्रिकेट जगतात जास्त ओळखले जातात. त्यांनी आपले पहिले लग्न धर्माने मुस्लिम असलेल्या शबनम यांच्याशी केले. त्या एका व्यावसायिकाची मुलगी होती. त्यांना पुढे मुलगा झाला तो अर्थातच भारताचा स्टार अष्टपैलू युवराज सिंग. योगराज यांना शबनम यांनी घरात रहावे असे वाटायचे तर शबनम या एक स्वतंत्र विचाराच्या महिला होत्या. त्यामुळे ते दोघेही पुढे वेगळे झाले. त्यानंतर योगराज सिंग यांनी सतवीर कौर यांच्याशी लग्न केले. त्यांना दुसऱ्या पत्नीपासून एक मुलगा विक्टोर तर मुलगी अमरजीत कौर झाले आहेत.
४. मोहम्मद अझरुद्दीन
भारतीय संघाचा माजी कर्णधार मोहम्मद अझरुद्दीननेही दोनदा लग्न केले आहे. नौरिन यांच्याशी अझरुद्दीन यांचा १९८७ साली लग्न झाले. हे लग्न पुढे ९ वर्ष टिकले. त्यानंतर १९९६मध्ये अभिनेत्री संगिता बिजलानी सोबत त्यांनी लग्न केले. त्यांना एकूण दोन मुले होती. त्यातील २०११मध्ये अयावुद्दीनचा अपघातात मृत्यु झाला तर दुसरा मुलगा असाऊद्दीन हा क्रिकेटर असून त्याने गोवा क्रिकेट संघाकडून दोन प्रथम श्रेणी सामने खेळले आहेत. २९ वर्षीय असाऊद्दीनने सानिया मिर्झाच्या बहिणीशी लग्न केले असून तिचेही हे दुसरे लग्न होते.
३. जवागल श्रीनाथ
जवागल श्रीनाथला म्हैसुर एक्सप्रेस म्हणून ओळखळे जाते. श्रीनाथने १९९९मध्ये पहिले लग्न केले. त्याचे व अनिल कुंबळेचे लग्न एकाच दिवशी झाले. श्रीनाथचे जोत्सनाबरोबर लग्न झाले परंतु पहिल्या लग्नानंतर काही वर्षांनी दोघांनी संमतीने घटस्फोट घेतला. नंतर २००७मध्ये तो पत्रकार माधवी पत्रावलींबरोबर लग्नबेडीत अडकला. या लग्नाला श्रीनाथच्या घरातील व खूपच जवळचे लोक उपस्थित होते.
२. विनोद कांबळी
विनोद कांबळीने १९९८मध्ये पुण्यातील हाॅटेल ब्लु डायमंडमध्ये रिसेप्शनिस्ट असलेल्या नोयला लेविलबरोबर लग्न झाले होते. ती त्याची बालपणापासून मैत्रिण होती. त्यानंतर काही वर्षात हे जोडपे वेगळे झाले व कांबळीने मॉडेल असलेल्या एड्रीया हेविटबरोबर लग्न केले. त्यानंतर कांबळीने ख्रिश्चन धर्म स्विकारला. त्यांना २०१०मध्ये पुत्रप्राप्ती झाली. त्याचे नाव जिजस क्रिस्तियानो कांबळी असे ठेवले आहे.
१. दिनेश कार्तिक
एमएस धोनी आधी भारतीय संघातून आंतरराष्ट्रीय पदार्पण केलेला दिनेश कार्तिक कधी भारतीय संघात स्थिरावला नाही. १६ वर्षांच्या कारकिर्दीत कार्तिक भारताकडून २६ कसोटी, ९४ वनडे व 60 टी२० सामने खेळला. कृष्णा कुमार दिनेश कार्तिक असे पुर्ण नाव असलेल्या कार्तिकने २००७मध्ये चेन्नईत बालमैत्रिण निकीता वंजाराशी वयाच्या २१व्या वर्षी लग्न केले. दोन्ही परिवार एकमेकांना चांगले ओळखत असल्याने त्यांनी खूपच लवकर विवाह केला. पुढे २०१२पर्यंत हे लग्न टिकले.
पुढे भारतीय कसोटीपटू मुरली विजयशी आपल्या पत्नीचे संबंध असल्याचे लक्षात आल्यावर कार्तिकने निकीताबरोबर घटस्फोट घेतला. २०१२नंतर एक वर्षाने कार्तिक व भारतीय स्काॅश खेळाडू दिपीका पल्लीकल एकमेकांना भेटले व ३ वर्षांच्या नात्यानंतर त्यांनी २०१५मध्ये लग्न केले. त्यांनी ख्रिश्चन व हिंदू अशा दोन्ही पद्धतीने लग्न केले.
महा स्पोर्ट्स टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@MahaSports) जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या क्रीडा घडामोडी मिळवा.
ट्रेंडिंग घडामोडी –
–३ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू ज्यांनी केले आहे महिला क्रिकेटरशी लग्न
–१० भारतीय क्रिकेटपटूंच्या पत्नी व त्या करत असलेलं काम
–घटस्फोटीत महिलांशी लग्न करणारे ५ भारतीय क्रिकेटर्स
–दोन वेळा लग्न केलेले १२ आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटू, ५ नावे आहेत भारतीय
–आणि झाली शिखर धवनची लव्हस्टोरी सुरु