गतविजेता गुजरात टायटन्स संघ आयपीएल 2023 स्पर्धेतही तुफान फॉर्ममध्ये आहे. शनिवारी (दि. 29 एप्रिल) कोलकाताच्या ईडन गार्डन्सवर कोलकाता नाईट रायडर्स वि. गुजरात टायटन्स संघात आयपीएल 2023चा 39वा सामना पार पडला. या सामन्यात गुजरातने 7 विकेट्सने दणदणीत विजय मिळवला. या विजयासह गुजरातने गुणतालिकेतील अव्वलस्थान काबीज केले. या विजयात गोलंदाजांसोबत फलंदाजांनीही शानदार कामगिरी केली. या विजयासाठी जोशुआ लिटल याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, या विजयासह गुजरातने एक खास पराक्रमही केला. काय आहे तो पराक्रम, चला जाणून घेऊयात…
या सामन्यात गुजरात टायटन्स (Gujarat Titans) संघाने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी कोलकाताने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 20 षटकात 7 विकेट्स गमावत 179 धावा केल्या. या आव्हानाचा पाठलाग करताना गुजरातने 17.5 षटकात 3 विकेट्स गमावत 180 धावा केल्या आणि 7 विकेट्सने सामना जिंकला.
गुजरातचे 12 वेगळे सामनावीर खेळाडू
या सामन्यात कोलकाताच्या डावात जोशुआ लिटल (Joshua Little) याने 4 षटके गोलंदाजी करताना 25 धावा खर्च करत 2 विकेट्स नावावर केल्या. या कामगिरीसाठी सामन्यानंतर त्याला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आले. विशेष म्हणजे, जोशुआ हा सामनावीर पुरस्कार पटकावणारा गुजरातचा 12वा वेगळा खेळाडू ठरला.
PLUMB!
Joshua Little breaks the partnership for @gujarat_titans 🙌🏻
Venkatesh Iyer walks back for 11.
Follow the match ▶️ https://t.co/SZJorCvgb8 #TATAIPL | #KKRvGT pic.twitter.com/HXaftnq3BA
— IndianPremierLeague (@IPL) April 29, 2023
गुजरातसाठी सर्वात पहिला सामनावीर पुरस्कार मोहम्मद शमी याने पटकावला होता. त्यानंतर दुसरा सामनावीर पुरस्कार लॉकी फर्ग्युसन याने जिंकला होता. त्याच्याव्यतिरिक्त तिसरा सामनावीर पुरस्कार कर्णधार हार्दिक पंड्या (Hardik Pandya) याने जिंकला. डेविड मिलर याने चौथा पुरस्कार जिंकला. पाचवा सामनावीर पुरस्कार राहुल तेवतिया याने जिंकला. त्यानंतर गुजरातसाठी सहावा सामनावीर पुरस्कार शुबमन गिल याने जिंकला. याव्यतिरिक्त सातवा सामनावीर पुरस्कार वृद्धिमान साहा याने जिंकला. या खेळाडूंनी हे सर्व पुरस्कार आयपीएल 2022 हंगामात जिंकले होते.
आयपीएल 2023मध्ये गुजरात संघाकडून जिंकलेल्या सामनावीर पुरस्कारांमध्ये जोशुआ लिटल याच्याव्यतिरिक्त राशिद खान, साई सुदर्शन, मोहित शर्मा आणि अभिनव मनोहर या खेळाडूंचा समावेश आहे. विशेष म्हणजे, यादीतील आठ नावे ही भारतीय आहेत.
मागील वर्षी आयपीएल स्पर्धेत सामील झालेल्या गुजरात टायटन्सकडून सामनावीर पुरस्कार जिंकणारे हे 12 खेळाडू होते. (12 different potm awards for gujarat titans know their names)
गुजरात टायटन्सचे सामनावीर पुरस्कार जिंकणारे वेगवेगळे 12 खेळाडू
मोहम्मद शमी
लॉकी फर्ग्युसन
हार्दिक पंड्या
डेविड मिलर
राहुल तेवतिया
शुबमन गिल
वृद्धिमान साहा
राशिद खान
साई सुदर्शन
मोहित शर्मा
अभिनव मनोहर
जोशुआ लिटल*
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
गुरबाजची 81 धावांची वादळी खेळी व्यर्थ, शंकर-मिलरच्या जोरावर KKRचा धुव्वा उडवत गुजरात संघ बनला ‘टॉपर’
IPLच्या 40व्या सामन्यात भिडणार DC vs SRH संघ, नाणेफेक हैदराबादच्या पारड्यात; दोन खेळाडूंचे पदार्पण