सध्या इटली मध्ये सुरु असलेल्या वर्ल्ड जुनिअर चॅम्पिअनशिप स्पर्धेत भारताच्या १२ वर्षीय आर प्रग्ग्नानंधाला सर्वात कमी वयाचा ग्रँड मास्टर बनण्याची संधी आहे. या स्पर्धेत ७ फेरी झाल्या आहेत यात सध्या नॉर्वेचा आर्यन तारी ६/७ गुणांसह अव्वल आहे. परंतु त्याच्यासाठीही ही स्पर्धा जिंकणे तितके सोपे नाही.
या स्पर्धेत ५.५/७ गुण मिळवणारे ९ मुले आणखीन आहेत ज्यात प्रग्ग्नानंधाचा देखील समावेश आहे.
प्रग्ग्नानंधाने मागील वर्षी मे महिन्यात चेस इतिहासातील सर्वात कमी वयाचा आंतरराष्ट्रीय मास्टर बनण्याचा पराक्रम केला होता. त्यावेळी तो फक्त १० वर्षे १० महिने आणि १९ दिवसांचा होता. आजही त्याला असाच सर्वात कमी वयाचा ग्रँड मास्टर बनण्याचा जागतिक विक्रम करण्याची संधी आहे.
ही स्पर्धा २० वर्षांखालील मुलांसाठी असली तरी प्रग्ग्नानंधा हा त्यामानाने त्याच्या बाकीच्या प्रतिस्पर्ध्यांपेक्षा तो खूपच लहान आहे. पण तरीही तो जर या स्पर्धेत पहिला आला तर त्याला ग्रँड मास्टर हे पद मिळेल.
स्पर्धेच्या नियमानुसार जर या स्पर्धेचा विजेता ग्रँड मास्टर नसेल तर त्याला ग्रँड मास्टर हे विजेतेपद देऊन गौरवण्यात येईल. परंतु जर या स्पर्धेचे विजेतेपद विभागून देण्यात आले तर मात्र ग्रँड मास्टर हे पद देण्यात येणार नाही.