-आदित्य गुंड
तेरा आकडा बरेच जण अशुभ मानतात. भारतात त्याच फारसं प्रस्थ नसलं तरी मानणारे लोक आपल्याकडेही आहेतच. बरेच लोक १३ तारखेला काही महत्वाचं करत नाहीत, विमानांमध्ये तेरावी रो नसते, बिल्डिंग मध्ये तेरावा मजला नसतो अशी अनेक उदाहरणे. या सगळ्याच आजच काय कौतुक?
तर आज रोहितच्या कारकिर्दीला १३ वर्षे पूर्ण होत आहेत. तेरा अशुभ असेल तर मग यावर लिहायचं तरी का? तर रोहितचे ग्रह म्हणा किंवा किंवा त्याच्या चाहत्यांच्या प्रार्थनेचे फळ म्हणा किंवा या सगळ्यात काही अर्थ नाही म्हणून म्हणा पण रोहितच्या कारकिर्दीतील तेरावं वर्ष त्याच्यासाठी भन्नाट गेलंय. किती? २३ जून २०१९ ते २३ जून २०२० या एका वर्षातली रोहितच्या फलंदाजीची आकडेवारी.
कसोटी
सामने ५
धावा ५५६
शतके ३
सर्वोत्तम धावसंख्या २१२
सरासरी – ९२.६६
एकदिवसीय
सामने १४
धावा ७८५
शतके ५
अर्धशतके १
सर्वोत्तम धावसंख्या १५९
सरासरी ९७.३९
टी-२०
सामने १४
धावा ४४२
अर्धशतके ५
सर्वोत्तम धावसंख्या ८५
स्ट्राईक रेट १४४.९१
म्हणजे रोहितने या वर्षात (२३ जून २०१९ ते २३ जून २०२० ) क्रिकेटच्या तिन्ही प्रकारांत १७८३ धावा केल्या. यात ८ शतके आणि ५ अर्धशतके आहेत. हाच कालावधी १ जून २०१९ पासून मोजला तर त्याच्या शतकांची संख्या १० होते आणि धावसंख्या २१०३ होते. शिवाय यात लॉकडाऊनमध्ये ४ महिने जवळपास वाया गेलेत.
सांगायचा मुद्दा हा की रोहितने त्याच्या कारकिर्दीच्या तेराव्या वर्षात गोलंदाजांचे बारा वाजवले आहेत. रोहितला कुणी तेरावे वर्ष तुझ्यासाठी अशुभ ठरेल असं सांगितलं असेल तर त्याचे अंदाज रोहितने साफ खोटे ठरवले आहेत हे या आकडेवारीवरून स्पष्ट दिसतंय. त्यामुळे उगाच १३ आकडा अशुभ वगैरे अंधश्रद्धा मानत बसू नका आणि रोहितप्रमाणे १३ चे बारा वाजवायला शिका.