---Advertisement---

मलिंगाच्या अनुपस्थितीत अमित मिश्राला खुणावतोय आयपीएलमधील ‘हा’ सर्वात मोठा विक्रम

---Advertisement---

मुंबई । अनुभवी फिरकीपटू अमित मिश्रा इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) फ्रेंचायझी संघ दिल्ली कॅपिटल्स संघाचे प्रतिनिधित्व करत आहे. मिश्रा या स्पर्धेत मुंबई इंडियन्सच्या लसिथ मलिंगाचा आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेण्याचा विक्रम मोडू शकतो. मलिंगाने वैयक्तिक कारणास्तव यावेळी आयपीएल स्पर्धेतून माघार घेतली आहे.

मलिंगाने आयपीएलच्या 122 सामन्यांत 170 विकेट्स घेतले आहेत, जे या स्पर्धेत सर्वाधिक विकेट्स आहेत. तर दिल्ली कॅपिटल्सच्या मिश्राने 147 सामन्यांत 157 बळी घेतले असून मलिंगाचा विक्रम मोडण्यासाठी त्याला 14 विकेट्सची गरज आहे.

मिश्रा व्यतिरिक्त, चेन्नई सुपर किंग्ज संघाचा फिरकीपटू हरभजन सिंग आणि पीयूष चावलादेखील मलिंगाचा विक्रम मोडण्याच्या शर्यतीत होते, परंतु वैयक्तिक कारणांमुळे हरभजनने आयपीएलमधून माघार घेण्याचे ठरविले, आता मलिंगाचा विक्रम मोडणारा दुसरा स्पर्धक फक्त चावल‍ाच शिल्लक आहे.

चावलाने आतापर्यंत 157 सामन्यात 150 विकेट्स घेतले आहेत. गेल्या डिसेंबरमध्ये आयपीएल 2020 च्या लिलावात चावलाला खरेदी करण्यासाठी चेन्नई सुपरकिंग्जने 6.75 कोटी रुपये खर्च केले. मलिंगाचा विक्रम मोडण्यासाठी चावलाला चमकदार कामगिरी करावी लागेल. तसेच हा विक्रम मोडण्यासाठी आणखीन 21 बळी मिळवायचे आहेत. सीएसकेचा वेगवान गोलंदाज ड्वेन ब्राव्होने 134 सामन्यांत 147 बळी घेतले आहेत. सर्वाधिक विकेट घेणार्‍या गोलंदाजांच्या यादीत तो पाचव्या क्रमांकावर आहे.

आयपीएलच्या १३ व्या हंगामातील पहिला सामना चेन्नई सुपर किंग्स आणि मुंबई इंडियन्स यांच्यात 19 सप्टेंबरला होणार आहे. भारतात कोविड -19 च्या घटनांमध्ये वाढ झाल्यामुळे संयुक्त अरब अमिरातीच्या (यूएई) तीन ठिकाणी दुबई, अबू धाबी आणि शारजाह येथे यावर्षी जगातील सर्वात मोठी टी20 लीग म्हणजेच आयपीएल होत आहे.

आयपीएलमध्ये सर्वाधिक विकेट्स घेणारे गोलंदाज –

170 विकेट्स – लसिथ मलिंगा

157 विकेट्स – अमित मिश्रा

150 विकेट्स – हरभजन सिंग

150 विकेट्स – पियुष चावला

147 विकेट्स – ड्वेन ब्रावो

Join WhatsApp

Join Now

---Advertisement---