अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वाखालील गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सने आयपीएल 2025 च्या सामन्यात गेल्या हंगामातील उपविजेत्या सनरायझर्स हैदराबादला 80 धावांनी पराभूत करून हंगामातील आपला दुसरा विजय नोंदवला. या सामन्यात, नाणेफेक गमावल्यानंतर, केकेआर संघाने प्रथम फलंदाजी करत 20 षटकांत 6 गडी गमावून 200 धावा केल्या. केकेआरच्या फलंदाजीत, व्यंकटेश अय्यरने 60 धावांची महत्त्वाची आक्रमक खेळी खेळली.
कोलकाता नाईट रायडर्सने सनरायझर्स हैदराबादविरुद्धचा सामना 80 धावांनी जिंकला असला तरी, एक वेळ अशी होती जेव्हा केकेआर देखील अडचणीत होता. एकामागून एक दोन विकेट पडल्या आणि त्यानंतर लगेचच जेव्हा तिसरी विकेटही पडली तेव्हा व्यंकटेशने जबाबदारी घेतली आणि संघाला 200 धावांचा टप्पा ओलांडून नेले.
पाचव्या क्रमांकावर फलंदाजीला आलेल्या व्यंकटेश अय्यरने फक्त 29 चेंडूत 60 धावा केल्या. ज्यात त्याने 7 चाैकार आणि 3 षटकार मारले. एकेकाळी संघ 200 धावांपर्यंत पोहोचेल असे वाटत नव्हते, पण अय्यरने एक शानदार खेळी खेळली आणि आपल्या संघाला त्या टप्प्यावर पोहोचवले.
The Curvv Super Striker of the Match between Kolkata Knight Riders and Sunrisers Hyderabad goes to Venkatesh Iyer.#TATAIPL | #KKRvSRH | #CurvvSuperStriker | @TataMotors_Cars pic.twitter.com/FtQap4t6mm
— IndianPremierLeague (@IPL) April 3, 2025
क्विंटन डी कॉकच्या रुपाने कोलकाता नाईट रायडर्स अवघ्या 14 धावांवर पहिली विकेट गमावली. यानंतर, 16 धावांवर संघाला आणखी एक धक्का बसला; सुनील नारायणही सात धावा काढून बाद झाला. अजिंक्य रहाणे 38 धावांवर बाद झाल्यावर व्यंकटेश अय्यरला फलंदाजीसाठी आला. हंगामातील पहिल्या सामन्यात व्यंकटेश अय्यरने आरसीबीविरुद्ध फक्त सहा धावा केल्या. त्यानंतर त्याने राजस्थान रॉयल्सविरुद्ध फलंदाजी केली नाही. मुंबई इंडियन्सविरुद्ध तो फक्त तीन धावा करू शकला. यानंतर तो टीकाकारांचे लक्ष्य होता, पण आता त्याच्या मोठ्या खेळीने सर्वांना शांत केले आहे.






