क्रिकेट हा भारतात सर्वात लोकप्रिय खेळ आहे. तसेच इथल्या लोकांमध्ये लहानपणापासूनच क्रिकेटविषयी एक ओढ असते. त्यामुळे प्रत्येक जण क्रिकेट खेळण्याचे स्वप्न पाहत असतो. त्यामुळे भारताच्या ठिकाणी आपणाला लहान मुले क्रिकेट खेळताना दिसून येतात. एवढेच नव्हे तर, भारतीय संघात देखील अवघ्या कोवळ्या वयातच काही क्रिकेटरांनी पदार्पण करून आपल्या खेळाचा जलवा दाखवला होता.
त्यातीलच एक म्हणजे ‘मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर’ ज्यांना आज क्रिकेटजगतात ‘गॉड ऑफ क्रिकेट’ म्हणून देखील संबोधले जाते. तेंडुलकरने देखील तरुणपणातच आपल्या कौशल्याचे दर्शन घडवून आणले होते. त्यानंतर पृथ्वी शाॅ देखील सध्याच्या भारतीय संघात असा युवा खेळाडू आहे. ज्याने अवघ्या १७-१८ वर्षांत आपल्या खेळीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर २०१८ साली या यादीत आणखी एका खेळाडूचे नाव जोडले गेले. ते म्हणजे गुजरातचा प्रियांशू मोलिया.
गुजरातच्या बडोदा मधल्या प्रियांशूने वयाच्या १४ व्या वर्षीच २०१८ साली नाबाद ५५६ धावांची अप्रतिम अशी खेळी केली होती. १४ वर्षाखालील डी.के गायकवाड क्रिकेट स्पर्धेमध्ये योगी क्रिकेट अकॅडमी विरुद्ध खेळताना, प्रियांशूने हा कारनामा केला होता. इतकेच नाही तर प्रियांशूने गोलंदाजी करताना देखील ४ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे प्रियांशूच्या अशा अष्टपैलू खेळीमुळे मोहिंदर लाला अमरनाथ अकॅडमीने हा सामना जिंकला होता.
विशेष म्हणजे प्रियांशू १९८३ सालच्या विश्वचषक स्पर्धेच्या भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केलेले, मोहिंदर अमरनाथ यांच्या ‘मोहिंदर लाला अमरनाथ अकॅडमी’कडून खेळायचा. अमरनाथ यांना प्रियांशूच्या कौशल्यावर खूप विश्वास आहे. त्यामुळेच ते स्वतः १४ वर्षीय प्रियांशूला प्रशिक्षण देण्याचे काम करतात.
दरम्यान, प्रियांशूने योगी क्रिकेट अकॅडमी विरुद्ध खेळताना ३१९ चेंडूमध्ये ५५६ धावा केल्या होत्या. ज्यात त्याने १ षटकारासह तब्बल ९८ चौकार मारले होते. याच्या आधी पृथ्वी शॉने देखील मुंबईच्या एका अकॅडमीकडून खेळताना असा कारनामा केला होता. त्यावेळी खुद्द सचिन तेंडुलकर यांनी देखील शाॅचे भरभरून कौतुक केले होते.
महत्वाच्या बातम्या –
–ऑफ टू दुबई! उर्वरित आयपीएल २०२१ साठी चेन्नई, मुंबई पाठोपाठ दिल्लीचा संघही पोहचला युएईमध्ये, पाहा व्हिडिओ
–युवा ऋतुराज गायकवाड एमएस धोनीकडून घेतोय फलंदाजीचे धडे, व्हिडिओने जिंकली चाहत्यांची मनं
–गुडन्यूज आली रे! महिला क्रिकेटर मेगन शटच्या जोडीदार जेसने दिला चिमुकलीला जन्म; पाहा क्यूट फोटो