पुणे। बाऊन्स टेनिस अकादमी व सनी वर्ल्ड यांच्या तर्फे आयोजित व एमएसएलटीए यांच्या मान्यतेखाली होत असलेल्या सनी स्पोर्ट्स किंगडम-एमएसएलटीए एआयटीए 16वर्षांखालील चॅम्पियनशिप सिरिज 2022 स्पर्धेत देशभरातून 140 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदवला आहे. ही स्पर्धा सनी वर्ल्ड टेनिस कोर्ट, पाषाण सुस रोड या ठिकाणी 16 ते 22 एप्रिल 2022 या कालावधीत होणार आहे.
स्पर्धेत एकूण 140 खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला आहे. स्पर्धेतील विजेत्या व उपविजेत्या करंडक व प्रशस्तिपत्रक अशी पारितोषिके देण्यात येणार आहे.