दुबई। 14 व्या एशिया कप स्पर्धेत आज (18 सप्टेंबर) भारताचा पहिला सामना हाँग काँग विरुद्ध सुरु आहे. या सामन्यात भारताकडून सलामीवीर फलंदाज शिखर धवनने शतक केले आहे.
हाँग काँगने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजीचा घेतला होता. मात्र या निर्णयाला चुकीचे ठरवत शिखरने 14 वे वनडे शतक केले आहे. याबरोबरच त्याने अनेक विक्रमांनाही गवसणी घातली आहे.
त्याने या सामन्यात 120चेंडूत 127 धावा केल्या. यात त्याने 15 चौकार आणि2षटकार मारले.
त्याने सुरुवातीला कर्णधार रोहित बरोबर 45 धावांची सलामी भागीदारी रचली होती. त्यानंतर त्याने दुसऱ्या विकेटसाठी अंबाती रायडू बरोबर 116 धावांची शतकी भागीदारी रचली.
रोहितने या सामन्यात 23 आणि रायडूने 60 धावा केल्या आहेत.
शिखरने केले हे खास विक्रम-
– डाव्या हाताने फलंदाजी करताना वनडेत सर्वाधिक शतके करणाऱ्या फलंदाजांमध्ये शिखरने केली युवराज सिंगची बरोबरी. या दोघांनीही 14 शतके केली आहेत. तसेच या यादीत अव्वल क्रमांकावर 22 शतकांसह सौरव गांगुली आहे.
-वनडेत सर्वाधिक शतके करणाऱ्या भारतीय सलामीवीर फलंदाजांच्या यादीत शिखर धवन विरेंद्र सेहवाग सह चौथ्या स्थानी. या यादीत 45 शतकांसह सचिन तेंडुलकर अव्वल स्थानी तर 19 आणि 16 शतकांसह अनुक्रमे गांगुली आणि रोहित शर्मा दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी.
– संयुक्त अरब अमिरातीमध्ये सचिन तेंडुलकर नंतर शतक करणारा शिखर पहिला भारतीय फलंदाज. सचिनने 18 वर्षांपूर्वी 20 आॅक्टोबर 2000 ला श्रीलंकेविरुद्ध शारजाला केले होते शतक.
-सर्वात जलद 14 वे वनडे शतक करणारा शिखर चौथ्या क्रमांकाचा फलंदाज. त्याने 105 वनडे डावात ही कामगिरी केली आहे. या यादीत हाशिम अमला 84 डावांसह अव्वल स्थानी. तर त्याच्या पाठोपाठ दुसऱ्या आणि तिसऱ्या स्थानी अनुक्रमे डेव्हिड वॉर्नर(98) आणि विराट कोहली (103).
-हाँग काँग विरुद्ध वनडेत शतक करणारा शिखर तिसरा भारतीय फलंदाज. याआधी एमएस धोनी आणि सुरेश रैनाने केला आहे हा पराक्रम.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–टॉप ५: भारत-पाकिस्तान सामन्यादरम्यान या विक्रमांकडे असणार लक्ष
–एशिया कप २०१८: भारत विरुद्ध पाकिस्तान सामन्याबद्दल सर्वकाही…
–भारताकडून पदार्पण करत असलेला कोण आहे खलील अहमद