१६ आॅगस्ट रोजी कॅरेबियन प्रीमियर लीगमध्ये सेंट ल्युसिया स्टार्स विरुद्ध ट्रिंबॅंगो नाईट रायडर्समध्ये झालेल्या सामन्यात तब्बल ३४ षटकारांची बरसात झाली.
या सामन्यात नाणेफेक जिंकत ट्रिंबॅंगो नाईट रायडर्सने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. त्यामुळे प्रथम फलंदाजीला आलेल्या सेंट ल्युसिया स्टार्सने २० षटकांत २ बाद २१२ धावा केल्या.
यात स्टार्सच्या फलंदाजांनी तब्बल १६ षटकार मारले. यातील ७ षटकार केराॅन पोलार्डने तर ५ षटकार रखीम काॅर्नवाॅलने मारले.
२० षटकांत २१३ धावांचे लक्ष घेऊन मैदानात आलेल्या ट्रिंबॅंगो नाईट रायडर्सने हे लक्ष १९.५ षटकांत पार करताना सामना ५ विकेट्सने जिंकला.
फलंदाजी करताना ट्रिंबॅंगो नाईट रायडर्सच्या फलंदाजांनीही तब्बल १८ षटकार आणि १३ चौकारांची बरसात केली. १७ पैकी तब्बल १० षटकार हे एकट्या डॅरेन ब्रावोने मारले. त्याने ३६ चेंडूत नाबाद ९४ धावांची खेळी केली.
काय इतिहास घडला?
टी२०मध्ये दोन्ही डावात प्रत्येकी १५ षटकार मारण्याची ही केवळ चौथी वेळ होती. यापुर्वी २०१६मध्ये सेंट्रल डिस्ट्रीक्ट (१६) विरुद्ध ओटॅगो (१८) सामन्यात एकुण ३४, २०१८मध्ये बेंगलोर (१६) विरुद्ध चेन्नई (१७) सामन्यात एकुण ३३ तर पंजाब (१६) विरुद्ध कोलकाता (१५) सामन्यात एकुण ३१ षटकार मारले होते.
टी२० सामन्यात केवळ दुसऱ्यांदा ३४ षटकार मारले गेले आहेत. यापुर्वी २०१६मध्ये सेंट्रल डिस्ट्रीक्ट (१६) विरुद्ध ओटॅगो (१८) सामन्यात एकुण ३४मारले होते.
RECORD BREAKERS!!! 34 sixes in a T20 game, THE MOST EVER!!! #SLSvTKR #CricketPlayedLouder #CPL18 pic.twitter.com/huBFjpfjVu
— CPL T20 (@CPL) August 17, 2018
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअॅपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअॅप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या:
–दंगल चित्रपटामुळे मोठे नुकसान झाले- गीता फोगट
–अटल बिहारी वाजपेयी होते हॉकी-फुटबॉलचे चाहते