न्यूयॉर्क । क्ले कोर्टचा किंग अशी ओळख असणाऱ्या स्पेनच्या राफेल नदालने हार्ड कोर्टवर विक्रमी कामगिरी करत तिसऱ्या अमेरिकन ओपनच्या विजेतेपदाला गवसणी घातली. काल येथे झालेल्या अंतिम फेरीत नदालने समवयस्क रशियाच्या केविन अँडरसनवर६-३, ६-३- ६-४ अशी मात करत अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेचे विजेतेपद जिंकले.
हे त्याचे हार्ड कोर्टवरील ४थे विजेतेपद असून अमेरिकन ओपनमधील तिसरे विजेतेपद आहे. यापूर्वी त्याने २०१० आणि २०१३ या वर्षी स्पर्धेचे विजेतेपद जिंकले होते.
याबरोबर नदालने काही विक्रमही केले ते असे
– हे नदालचे १६ वे ग्रँड स्लॅम विजेतेपद. सर्वाधिक विजेतेपद जिंकणाऱ्या खेळाडूंच्या यादीत फेडरर(१९) पाठोपाठ दुसरा
–नदालने यापूर्वी फ्रेंच ओपन(१०), अमेरिकन ओपन(३), विम्बल्डन(२) आणि ऑस्ट्रेलियन ओपन(१) अशी विजेतेपद जिंकली आहेत.
–यावर्षीच नदालच हे दुसरं ग्रँडस्लॅम असून त्याने जून महिन्यात फ्रेंच ओपनच विक्रमी १०व विजेतेपद जिंकलं होत
–हा असे चौथे वर्ष आहे ज्यात नदालने २ किंवा त्यापेक्षा अधिक ग्रँड स्लॅम विजेतेपदं जिंकली आहेत. यापूर्वी त्याने २०१०, २००८. २०१३ मध्ये अशी कामगिरी केली होती.
–या वर्षीच्या चारही ग्रँडस्लॅम स्पर्धात दोन नदालने तर दोन फेडररने जिंकल्या आहेत.
– नदालने याबरोबर तीनही प्रकारच्या कोर्टवर कमीतकमी २ विजय मिळवले आहेत. क्ले कोर्ट(१०), ग्रास कोर्ट(२) आणि हार्ड कोर्ट(४) अशी ती विजेतेपद
– २०१० नंतर प्रथमच नदाल आणि फेडरर यांनी वर्षातील ग्रँडस्लॅम जिंकली आहेत.
– नदालचा टॉप-२० मधील एकही मानांकन मिळालेला खेळाडूंबरोबर या स्पर्धेत सामना झाला नाही. अशी होण्याची ही २००२ नंतर पहिलीच वेळ
–मार्च २०११ नंतर नदाल आणि फेडरर एटीपी क्रमवारीत अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या क्रमांकावर येण्याची पहिलीच वेळ