शुक्रवारी (15 सप्टेंबर) दक्षिण आफ्रिकेचा अनुभवी फलंदाज हेनरिक क्लासेन वादळी फॉर्ममध्ये दिसला. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या चौथ्या वनडे सामन्यात त्याने अवघ्या 57 चेंडूत शतक केले. यात 7 चौकार आणि 6 षटकार होते. विषेश म्हणजे शतकातील शेवटच्या 21 धावा त्याने अवघ्या पाच चेंडूत केल्या.
हेनरिक क्लासेन (Heinrich Klaasen) याने आपले शेवटचे वनडे शतक मार्च महिन्यात ठोकले होते. त्यानंतर आता जवळपास सहा महिन्यांच्या अंतराने पुन्हा एकदा त्याने आपला तोच जबरदस्त फॉर्म दाखवला आहे. 57 चेंडूत शतक करताच क्लासेन दक्षिण आफ्रिकेसाठी पाचवे सर्वात वेगवान शतक करणारा फलंदाज देखील बनला आहे. या खास यादीत पहिला क्रमांक माजी कर्णधार एबी डिविलियर्स ( AB de Villiers) याचा आहे. डिविलियर्सने 2015 मध्ये अवघ्या 31 चेंडूत वनडे शतक केले होते.
दक्षिण आफ्रिका संघासाठी सर्वात वेगवान वनडे शतक करणारे फलंदाज
31 (चेंडू) – एबी डिविलियर्स (2015)
44 – मार्क बाउचर (2006)
52 – एबी डिविलियर्स (2015)
54 – हेनरिक क्लासेन (2023)
57 – हेनरिक क्लासेन (2023)
57 – एबी डिविलियर्स (2015)
57 – एबी डिविलियर्स (2015)
58 – एबी डिविलियर्स (2010)
66 – एबी डिविलियर्स (2014)
68 – एबी डिविलियर्स (2017)
(174 in 83 balls…all time great innings from Heinrich Klassen)
हेनरिक क्लासेनने या सामन्यात एकूण 174 धावांची महत्वपूर्ण खेळी केली. यासाठी त्याने अवघ्या 83 चेंडूंची मदत घेतली. 209.63च्या स्ट्राईक रेटने त्याने या धावा केल्या. यात 13 चौकार आणि 13 षटकारांचा समावेश होता. क्लासेनला शेवटच्या षटकांमध्ये फिनिशर डेविड मिलर (David Miller) याची चांगली साथ मिळाली. मिलरने 45 चेंडूत 6 चौकार आणि 5 षटकारांच्या मदतीने 82 धावा केल्या. नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीला आलेला दक्षिण आफ्रिका संघ ऑस्ट्रेलियाला चांगलाच माहागात पडला. 50 षटकांमध्ये 5 विकेट्सच्या नुकसानावर 416 धावा आफ्रिकी संघाने केल्या. ऑस्ट्रेलियाला विजयासाठी 417 धावांचे लक्ष्य मिळाले. ऑस्ट्रेलियन खेळाडूंना पहिल्या षटकापासून 8.30पेक्षा अधिक रन रेटने धावा करणे गरजेचे असेल.
दरम्यान, उभय संघांतील ही वनडे मालिका पाच सामन्यांची आहे. पहिल्या तीन सामन्यांपैकी दोन सामने पाहुण्या ऑस्ट्रेलियाने, तर एक सामना आफ्रिकी संघाने जिंकला आहे. अशात मालिका नावावर करण्यासाठी यजमान संघाला शेवटचे दोन्ही सामने जिंकणे गरजेचे आहे.
महत्वाच्या बातम्या –
भारतीय सलामीवीरांच्या निराशाजनक विकेट्स, वेगवान गोलंदाजामुळे बांगलादेशची शानदार सुरुवात
जडेजाने टाकले कपिल देवच्या पावलावर पाऊल! बनला अशी कामगिरी करणारा केवळ दुसरा भारतीय