पुणे । खेलो इंडिया युथ गेम्समध्ये महाराष्ट्राच्या १७ आणि २१ वर्षाखालील मुला-मुलींनी चमकदार कामगिरी करीत पदकांची कमाई केली. मंगळवार अखेर एकूण ६४ सुवर्ण, ५१ रौप्य आणि ६२ कांस्य पदकांची कमाई करीत महाराष्ट्राचा संघ १७७ पदकांसह आघाडी कायम राखली.
केंद्र सरकार आणि महाराष्ट्र शासनातर्फे महाळुंगे बालेवाडी येथील शिवछत्रपती क्रीडा संकुलात खेलो इंडिया युथ गेम्सचे आयोजन करण्यात आले आहे. मंगळवारी दिवसभरात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी नेमबाजी, जलतरण, वेटलिफ्टिंगमध्ये यश मिळवित पदके मिळविली.
नेमबाजी-
औरंगाबादची उद्योन्मुख खेळाडू हर्षदा निठवे हिने दहा मीटर एअर पिस्तूलमध्ये सोनेरी वेध घेत नेमबाजीमध्ये कौतुकास्पद कामगिरी केली. तिने २१ वषार्खालील मुलींमध्ये २३६.३ गुणांची नोंद केली. ती औरंगाबाद येथील एमजीएम नेमबाजी अकादमीत संग्राम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. युविका तोमर (उत्तरप्रदेश) व श्वोता देवी (पंजाब) यांनी अनुक्रमे रौप्य व ब्राँझपदक पटकाविले.
हर्षदा हिने आतापर्यंत सहा आंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भाग घेत भरघोस पदकांची कमाई केली आहे. तिने शालेय गटाच्या राष्ट्रीय स्पर्धांमध्येही पदकांची लयलूट केली आहे. ती दररोज पाच तास सराव करीत आहे. तिचे वडीलांची खानावळ असून त्यामध्ये मिळणाºया उत्पन्नाद्वारेच तिच्या नेमबाजीसाठी खर्च केला जात आहे. हर्षदा हिला लहानपणापासून नेमबाजीची आवड असून शाळेत असताना ती नेमबाजी स्पर्धा पाहण्यासाठी जात असे. तेथूनच तिने नेमबाजीत करिअर करण्याचा निर्णय घेतला. तिला आंतर शालेय स्पर्धांमध्ये यश मिळाल्यानंतर तिला घरच्यांकडून या खेळासाठी सहकार्य मिळाले आहे. ती सध्या अंबड येथील मत्स्त्योदरी महाविद्याालयात प्रथम वर्ष वाणिज्य शाखेत शिकत आहे.
मुलींच्या १७ वर्षाखालील गटात १० मीटर एअर पिस्तुल प्रकारात अनुष्का पाटील हिने २३४.७ गुणांसह रौप्यपदक मिळविले. तर, शर्वरी भोईर हिने २१३.६ गुणांसह कास्यंपदक जिंकले.
जलतरण-
जलतरणात महाराष्ट्राच्या ज्योती पाटील हिने २१ वर्षाखालील मुलींच्या गटात दोनशे मीटर्स ब्रेस्ट स्ट्रोक शर्यतीत सोेनेरी कामगिरी केली. तिने हे अंतर २ मिनिटे ४३,५४ सेकंदात पार केले. तिने चुरशीच्या शर्यतीत कल्याणी सक्सेना (गुजरात) व हर्षिता जयराम (कर्नाटक) यांच्यावर मात केली.
महाराष्ट्राला आणखी एक सुवर्णपदक करीना शांक्ता हिने २०० मीटर्स ब्रेस्ट स्ट्रोक शर्यत २ मिनिटे ४७.५५ सेकंदात जिंकली. तिचे हे या स्पधेर्तील दुसरे वैयक्तिक सुवर्णपदक आहे. याआधी तिने १०० मीटर्स ब्रेस्टस्ट्रोक शर्यत जिंकली होती.
महाराष्ट्राच्या आकांक्षा बुचडे हिने २१ वषार्खालील मुलींमध्ये १०० मीटर्स बटरफ्लाय शर्यतीत रौप्यपदक पटकाविले. तिने हे अंतर एक मिनिट ०८.४५ सेकंदात पार केले. राजस्थानच्या फिरदोश कयामखानी हिने ही शर्यत एक मिनिट ०७.१७ सेकंदात पार करीत सुवर्णपदक जिंकले. आकांक्षा ही विनय मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते. येथे तिने याआधी दोनशे मीटर्स बटरफ्लाय शर्यतीतही रौप्यपदक मिळविले आहे.
वेटलिफ्टिंग-
महाराष्ट्राने वेटलिफ्टिंगमध्ये दोन सुवर्णपदके जिंकून दुहेरी धमाका केला. मुलींच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या स्नेहल भोंगळे हिने ८७ किलो गटात सुवर्णपदक जिंकले. तिने स्नॅचमध्ये ६८ किलो वजन उचलले. क्लीन व जर्कमध्ये तिने ९२ किलो वजन उचलताना स्वत: नोंदविलेला ८७ किलो हा विक्रम मोडला. तिने एकूण १६० किलो वजन उचलले. उत्तरप्रदेशची शिवांगी सिंग (१५४ किलो) व केरळची अमृथा जयन (१३७ किलो) यांनी अनुक्रमे रौप्य व ब्राँझपदक मिळविले.
महाराष्ट्राच्या अश्विनी मळगे हिने १७ वषार्खालील मुलींच्या ८७ किलो गटात सुवर्णपदक जिंकले. तिने स्नॅचमध्ये ८० किलो वजन उचलले. क्लीन व जर्कमध्ये तिने १०४ किलो वजन उचलताना स्वत: नोंदविलेला १०३ किलो हा विक्रम मोडला. तिने एकूण १८४ किलो वजन उचलले. कर्नाटकची भाविशा (१८० किलो) व केरळची अॅन मारिया (१६७ किलो) यांना अनुक्रमे रौप्य व ब्राँझपदक मिळाले.
बास्केटबॉल :-
समीर कुरेशी याने लागोपाठ दोन वेळा तीन गुणांची नोंद केली, त्यामुळेच बास्केटबॉलमध्ये महाराष्ट्राने उत्तरप्रदेशवर ७४-६७ अशी मात केली. या सामन्यासह महाराष्ट्राने बास्केटबॉलमधील मुलांच्या २१ वर्षाखालील गटात झकास सलामी केली. मुलींच्या १७ वषार्खालील गटात मात्र महाराष्ट्राला पहिल्या लढतीत तामिळनाडूविरुद्ध ६३-७१ असा पराभव स्वीकारावा लागला.
त्यात महाराष्ट्र व उत्तरप्रदेश हा सामना विलक्षण रंगतदार झाला. पूर्वार्धात महाराष्ट्राने ३९-२९ अशी आघाडी घेतली होती. तथापि तिसºया डावाच्या अखेरीस उत्तरप्रदेशने ५७-५० अशी आघाडी मिळविली. शेवटची पाच मिनिटे बाकी असताना त्यांच्याकडे ६२-५७ अशी आघाडी होती. मात्र त्यानंतर महाराष्ट्राच्या खेळाडूंनी उत्कृष्ट सांघिक खेळास अचूकतेची जोड देत विजयश्री खेचून आणली. त्याचे श्रेय समीर कुरेशी (१४ गुण), अक्षय खरात (१५ गुण) व अर्जुन यादव (१७ गुण) यांच्या खेळास द्याावे लागेल. उत्तरप्रदेशच्या धीरज मयूर (१४ गुण) व प्रसून मिश्रा (१२ गुण) यांचे प्रयत्न अपुरे ठरले. या वयोगटातील अन्य सामन्यात पंजाबने राजस्थानचा ८१-६३ असा पराभव केला.
कबड्डी-
कबड्डीमध्ये महाराष्ट्राला संमिश्र यश पाहावयास मिळाले. मुलींच्या २१ वषार्खालील गटात महाराष्ट्राने आंध्रप्रदेशवर मात करीत बाद फेरीच्या आशा कायम राखल्या. मात्र १७ वषार्खालील मुलींमध्ये सलग दुसरा पराभव झाल्यामुळे महाराष्ट्राच्या बाद फेरी गाठण्याच्या आशा संपुष्टात आल्या आहेत.
मुलींच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राने आंध्रप्रदेशला ३१-१९ असे पराभूत केले. पूर्वार्धात त्यांनी १२-९ अशी आघाडी घेतली होती. उत्तरार्धात महाराष्ट्राच्या खेळाडूंनी जोरदार चढाया व अचूक पकडी करीत सहज विजय मिळविला. महाराष्ट्राकडून सोनाली हेळवी हिने अष्टपैलू खेळ करीत महत्त्वाचा वाटा उचलला.
खो खो-
महाराष्ट्राने २१ वर्षाखालील मुले व मुलींच्या गटात अपराजित्व राखताना बाद फेरीच्या दिशेने आगेकूच केली. महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने २१ वषार्खालील गटात केरळचा ट संघाने केरळचा व २१ वषार्खालील मुलींनी आंध्रप्रदेशचा पराभव केला.
मुलींच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राने आंध्रप्रदेशचा १४-२ असा एक डाव १२ गुणांनी पराभव केला. महाराष्ट्राकडून प्रियंका भोपी ( ४ मिनिटे १० सेकंद), अपेक्षा सुतार (२ मिनिटे ५० सेकंद), निकिता पवार (१ मिनिट ५० सेकंद) यांनी उल्लेखनीय खेळ केला. ऋतुजा खरे (३ गडी), मयुरी मुत्याल, प्रणाली बेनके (प्रत्येकी २ गडी) यांनीही महाराष्ट्राच्या विजयात महत्त्वाचा वाटा उचलला.
महाराष्ट्राच्या २१ वर्षाखालील मुलांच्या संघाने केरळचा १७-१३ असा पराभव केला. या सामन्यात महाराष्ट्राच्या अवधूत पाटील(२मि ४० सेकंद व दीड मिनिट, एक गडी), संकेत कदम (२ मिनिटे, दीड मिनिटे व ४ गडी), अरुण गुणके (एक मिनिट, दीड मिनिटे, ३ गडी) यांनी कौतुकास्पद कामगिरी केली.
महाराष्ट्राने १७ वर्षांखालील मुलांच्या गटात आंध्र प्रदेशचा एक डाव दोन गुणांनी पराभव केला. त्या वेळी महाराष्ट्राकडून विजय शिंदे, दिलीप खांडवी, चंदू चावरे यांचा खेळ उल्लेखनीय झाला. आंध्रकडून राम मोहन, अशोक कुमार, व्यंकटेश यांनी चमक दाखविली. १७ वषार्खालील मुलींमध्ये महाराष्ट्राने गुजरातचा १२-८ असा पराभव केला. त्याचे श्रेय किरण शिंदे, अश्विानी मोरे, दिक्षा सोनसूरकर, श्रुती शिंदे यांच्या अष्टपैलू खेळास द्याावे लागेल. गुजरातकडून निकिता सोळंकी, अर्पिता गमीत यांनी चांगली लढत दिली.
टेनिस-
आर्यन भाटिया याने हरयाणाच्या अजय मलिक याच्यावर ६-४, ६-४ अशी सरळ दोन सेट्समध्ये मात केली. हा विजय नोंदवित त्याने टेनिसमधील मुलांच्या १७ वषार्खालील गटात उपांत्य फेरी गाठली. उपांत्य फेरीत त्याच्यापुढे हरयाणाच्याच सुशांत दबास याचे आव्हान असणार आहे.
दबास याने उपांत्यपूर्व फेरीत चंडीगढच्या किसन हुडा याला ६-०, ६-१ असे निष्प्रभ केले. गुजरातच्या क्रिश पटेल याने उपांत्य फेरीत स्थान मिळविताना गुरु मक्कर याच्यावर ६-२, ६-२ असा सफाईदार विजय नोंदविला. गुजरातच्या जेविया देव यानेही उपांत्य फेरीकडे वाटचाल करताना अनीष राम्पोला याचे आव्हान ६-४, ६-२ असे संपुष्टात आणले.
मुलांच्या १७ वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या सानीष ध्रुव याने दुसºया फेरीत पुडुचेरी संघाच्या अभिषेक रुद्रेश्वार याला ६-१, ६-० असे निष्प्रभ केले. मात्र त्याचा सहकारी अथर्व शर्मा याला पश्चिम बंगालच्या नितीन सिन्हा याच्याकडून ७-५, ४-६, १-६ असा पराभव पत्करावा लागला.
मुलींच्या २१ वर्षाखालील गटात महाराष्ट्राच्या मिहिका यादव हिने उपांत्य फेरीत स्थान मिळविले. तिने उपांत्यपूर्व फेरीत तेलंगणाच्या काव्या बालसुब्रमण्यम हिला ६-०, ६-२ असे पराभूत केले. त्याआधी तिने चौथ्या मानांकित युब्रानी बॅनर्जी हिच्यावर ६-०, ६-२ असा सनसनाटी विजय नोंदविला होता. याच गटात झील देसाई, अग्रमानांकित महेक जैन या आंतरराष्ट्रीय खेळाडूंनी विजयी वाटचाल कायम राखली.
महाराष्ट्राच्या प्रेरणा विचारे हिने १७ वषार्खालील गटात इशिता सिंग (हरयाणा) हिचा ६-३, ६-२ असा सरळ सेट्समध्ये पराभव करीत अपराजित्व राखले. दुहेरीत महाराष्ट्राच्या सई भोयार व ह्रदया शहा यांनी विजयी वाटचाल केली. त्यांनी चंडीगढच्या पाखी भट्ट व साक्षी मिश्रा यांना सरळ दोन सेट्समध्ये ६-०, ६-० ने पराभूत केले.
मुष्टीयुद्ध-
महाराष्ट्राच्या देविका घोरपडे व लक्ष्मी पाटील यांनी मुष्टीयुद्धातील उपांत्य फेरीत स्थान मिळविले आणि पदक निश्चित केले. देविका हिने १७ वर्षाखालील मुलींच्या ४६ किलो वजनी गटात उपांत्य फेरी निश्चित केली. तिने गोव्याच्या आरती चौहान हिला ५-० असे हरविले. देविका ही पुण्यात आॅलिंपिकपटू मनोज पिंगळे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करते.
मुलींच्याच या वयोगटात लक्ष्मी पाटील हिने मध्यप्रदेशच्या आयुषी अवस्थी हिच्यावर ५-० असा विजय मिळविला. तिने सुरुवातीपासून आक्रमक पवित्रा घेतला होता. तिच्या प्रभावी खेळापुढे आयुषी हिला फारसा बचाव करता आला नाही.
महाराष्ट्राच्या बिश्वाामित्रा चोंगथोम याने ४१ किलो गटात पंजाबच्या अभिषेक सिंग याच्यावर ४-१ अशी मात केली. ५९ किलो गटात महाराष्ट्राच्या शोईकोर्म सिंग याने दिल्लीच्या यश कौशिक याचा ५-० असा दणदणीत पराभव केला. मात्र राओबासिंग या महाराष्ट्राच्या खेळाडूला उत्तराखंडच्या संजयकुमार याच्याकडून ०-५ असा पराभव स्वीकारावा लागला. ५० किलो गटात महाराष्ट्राच्या येफाबा मितेई याने अपराजित्व राखताना पंजाबच्या भिंदरसिंग याला ५-० असे पराभूत केले. त्याचा सहकारी शशिकांत यादव याला ६४ किलो गटात उत्तरप्रदेशच्या अभिषेक यादव याच्याकडून पुढे चाल मिळाली.
महाराष्ट्राच्या विजयदीप याला हरयाणाच्या नवीन बुरा याच्याविरुद्ध २-३ असा निसटता पराभव स्वीकारावा लागला. निखिल दुबे या स्थानिक खेळाडूने हरयाणाच्या सचिनकुमार याचा ५-० असा पराभव करीत ७५ किलो गटात आव्हान राखले.
महत्त्वाच्या बातम्या-
–धोनी धोनी है! विराट कोहलीचाही विक्रम टाकला मागे
–सामनावीर विराट कोहलीकडून गांगुलीच्या त्या खास विक्रमाचीही बरोबरी