कोरोना महामारीमूळे मागील जवळपास दीड वर्षाच्या कालावधीपासून मैदानांवर क्रीडाप्रेमींना येण्यास बंदी घालण्यात आली आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुन्हा एकदा मोठ्या संख्येने चाहते स्टेडियमवर येणे नक्की झाल्याची बातमी समोर येतेय. इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात १० जूनपासून एजबॅस्टन येथे होणाऱ्या दुसर्या कसोटी सामन्यासाठी चाहत्यांना परवानगी देण्यात आली असून, सरकार आणि इंग्लंड आणि वेल्स क्रिकेट बोर्ड (ईसीबी) यांच्यात यावर सहमती झाली आहे.
इतक्या चाहत्यांना परवानगी व या अटी
सरकार आणि ईसीबीने मैदान क्षमतेच्या ७० % म्हणजेच १८ हजार चाहत्यांना हा सामना पाहण्यास येण्याची परवानगी दिली आहे. मैदानात प्रवेश करताना चाहत्यांना कोरोनाच्या नकारात्मक चाचणीचा अहवाल दाखवण्यास सांगण्यात आले असून, हा अहवाल २४ तासापूर्वीचा असावा. मैदानात येणार्या सर्व लोकांचे वय १६ वर्षांपेक्षा जास्त असावे. २ जूनपासून लॉर्ड्स येथे होणाऱ्या पहिल्या कसोटीसाठी चाहते मैदानात येऊ शकणार नाहीत. एमसीसीने सामण्यासाठी तरुणांना जास्तीत जास्त तिकिट देण्याचे म्हटले आहे. चाहत्यांना कोरोना दरम्यान काऊन्टी क्रिकेटमध्ये देखील प्रवेश देण्यात आला आहे.
“आम्हाला या गोष्टीचा अनुभव”
एजबॅस्टन स्टेडियमचे मुख्य कार्यकारी अधिकारी स्टुअर्ट केन म्हणाले की, “हे मोठे स्टेडियम इतरांपेक्षा वेगळे आहे. आमच्याकडे एक अनुभवी ऑपरेशनल टीम असून, ज्यांना हे काम उत्कृष्टरित्या करता येते. गेल्या हंगामात आम्ही असे सामने आयोजित केले आहेत. आम्ही यासाठी पूर्ण तयार आहोत. स्टेडियममध्ये प्रेक्षक पाहणे आनंददायी असते.
कसोटी चॅम्पियनशिप अंतिम सामन्यात दिसणार प्रेक्षक
भारत आणि न्यूझीलंड यांच्यात होणाऱ्या जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यात चाहत्यांना मैदानात येण्याची परवानगी यापूर्वीच दिली गेली आहे. साऊथॅम्प्टन मैदानावर हा सामना १८ ते २२ जून दरम्यान होणार आहे. या सामन्यासाठी ४ हजार चाहत्यांना मैदानात येण्याची परवानगी दिली जाईल. आयसीसीच्या प्रायोजकांना २ हजार तिकिटे मिळतील. भारतीय संघ २ जूनला इंग्लंड दौऱ्यावर रवाना होईल. संघ सध्या मुंबईत विलगीकरणात आहे. कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यासह भारतीय संघाला इंग्लंडविरुद्ध ५ सामन्यांची कसोटी मालिका खेळेल.
महत्त्वाच्या बातम्या –
कोरोना झाल्यावर या गोष्टीची सर्वाधिक भीती वाटत होती, अक्षर पटेलने उलगडला अनुभव
दोन दिवसात दोन माजी क्रिकेटपटूंचे निधन, भारतीय क्रिकेट विश्वावर पसरली शोककळा
मी फक्त एकाच टी२० सामन्यात चांगली कामगिरी केली नाही