---Advertisement---

18 वर्षाच्या गोलंदाजापुढे बाबर आझम ढेपाळला, पाहा व्हिडिओ

On: बुधवार, जुलै 17, 2024 10:29 PM
Babar Azam
---Advertisement---

यंदाच्या आयसीसी टी20 विश्वचषकात (ICC T20 World Cup) पाकिस्तान संघ सुपर 8 मध्ये सुद्धा क्वालिफाय करु शकला नाही. अमेरिकेसारख्या संघानं पाकिस्तानला धूळ चारली. त्यामुळे अनेक दिग्गज खेळाडूंनी पाकिस्तान संघावर जोरदार टीका केली. तर सोशल मीडियावर कर्णधार बाबर आझमसह (Babar Azam) सर्व खेळाडू ट्रोल झाले. तत्पूर्वी फखर झमान आणि बाबर आझम नेटमध्ये सराव करताना दिसले. यामध्ये एका 18 वर्षीय गोलंदाजानं त्यांना चारीमुंड्या चित केलं.

पाकिस्तानसाठी अंडर 19 क्रिकेट खेळलेल्या उबेद शाहनं त्याच्या इंस्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. त्याच्यामध्ये तो पाकिस्तान कर्णधार बाबर आझम (Babar Azam) आणि फखर झमानला (Fakhar Zaman) गोलंदाजी करताना दिसत आहे. उबेद शाहनं बाबरला चेंडू टाकल्यावर तो त्याच्या कंबरेच्या आसपास लागला. त्यानंतर बाबरला दुखापत झाल्याचे दिसत होते.

उबेद शाह या गोलंदाजाचे वय 18 वर्ष आहे. तो पाकिस्तानसाठी अंडर 19 सामने खेळला आहे. त्याच्याकडे गोलंदाजी करण्यासाठी चांगली गती आहे. उबेद नेटमध्ये झमान आणि बाबरला गोलंदाजी करत असताना दोन्ही फलंदाज त्याच्या चेंडूवर बचावात्मक फलंदाजी करताना दिसले. तर दोघंही त्याचा चेंडू बाहेर सोडून देत होते.

 

View this post on Instagram

 

A post shared by Ubaid shah (@ubaidshah.13)

महत्त्वाच्या बातम्या-

“मी इथे हरवलो आहे” शिखर धवनची इंस्टाग्राम पोस्ट जोरदार व्हायरल
एका फलंदाजामुळे दुसरा फलंदाज झेलबाद…! मजेशीर व्हिडिओ एकदा पाहाच
“टी20 संघात विराट-रोहितची जागा कोणीही घेऊ शकत नाही”, कपिल देव असं का म्हणाले? 

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---