दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत (SA vs IND) यांच्यात नुकताच जोहान्सबर्ग येथे दुसरा कसोटी (Second Test) सामना पार पडला आहे. यजमान दक्षिण आफ्रिकेने ७ विकेट्स राखून हा सामना जिंकत ३ सामन्यांच्या कसोटी मालिकेत १-१ अशी बरोबरी केली आहे. दक्षिण आफ्रिकेला हा सामना जिंकून देण्यात त्यांचा कर्णधार डीन एल्गर (Dean Elgar) याने सिंहाचा वाटा उचलला. अखेरच्या डावात नाबाद ९६ धावांचे योगदान देत त्याने संघाला विजयाच्या नजीक नेले. याच एल्गरने चौथ्या दिवसाचा खेळ सुरू होण्याच्या एक रात्रीपूर्वी त्याच्या वडिलांजवळ दावा केला होता की, दुसऱ्या दिवशी तो शेवटपर्यंत खेळपट्टीवर टिकून राहिल आणि भारतीय संघाला त्याला बाद करण्यासाठी त्याला जखमी करावे लागेल.
इंडियन एक्सप्रेसमधील वृत्तात सांगितले आहे की, एल्गरचे वडिल रिचर्ड एल्गर (Richard Elgar) यांच्यानुसार एल्गर लहानपणीपासूनच असा आहे. जेव्हा तो ५ वर्षांचा होता, तेव्हा तो आपल्यापेक्षा वयाने ६ वर्षांनी मोठ्या असलेल्या मित्रांच्या भावांसोबत क्रिकेट खेळत असे. यावेळी २ सीनियर मुले एल्गरला वेगवान गोलंदाजी करत होते. तेव्हा ५ वर्षांच्या एल्गरने त्याच्या वडिलांकडे पाहिले आणि चिंता करू नका पप्पा असे म्हटले. तसेच तो पुढे बोलताना म्हणाला होता की, ती मुले मला बाद करू शकणार नाहीत. यावरून एल्गरमधील जिद्द दिसून येते.
एल्गरचे वडील पुढे सांगतात की, त्यांचा मुलगा खूप जिद्दी होता. त्यावेळी जर तो बाद झाला तर तो अजून एकदा फलंदाजी करू इच्छित असायचा. कारण तो त्यांच्यापेक्षा वयाने छोटा होता.
हेही वाचा- जन्माने पाकिस्तानी असलेला ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा सचिन-विराटला ‘या’ बाबतीत ठरलाय वरचढ
एल्गरचे बोलणे ऐकून मुख्याध्यापकही झाले होते थक्क
पुढे एल्गरविषयीचा एक किस्सा त्यांनी सांगितला. ते म्हणाले की, “जर एल्गरने कोणती गोष्ट ठरवली तर तो अजिबात त्याचे मन बदलत नाही. बालपणीपासूनच व्यावसायिक क्रिकेट खेळण्याचे त्याचे स्वप्न होते. प्राथमिक शाळेत असतानाच नेहमी एल्गर म्हणत असे की, तो आयुष्यभर फक्त क्रिकेट खेळणार आहे. त्याने फक्त मला नव्हे तर त्याच्या शिक्षकांनाही असे सांगून ठेवले होते.”
“एकदा शाळेच्या मुख्याध्यापकांनी एल्गरला त्याचा क्लासवर्क आणि अभ्यासावर अजून जास्त मेहनत घे, हे सागण्यासाठी बोलावले होते. हे ऐकताच छोट्या एल्गरने मुख्याध्यापकांना सडेतोड प्रत्युत्तर दिले होते. तो म्हणाला होता की, मी इथे फक्त क्रिकेट खेळण्यासाठी आलो आहे. हे ऐकून मुख्याध्यापकांना त्यांच्या कानावर विश्वास बसला नव्हता. त्यांनी वर्षभरानंतर एल्गरच्या वडिलांना यासंदर्भात माहिती दिली होती,” असे त्यांनी पुढे म्हटले.
महत्त्वाच्या बातम्या-
खुद्द ब्रँड अँबेसेडर अमिताभ यांनाही मिळाली चुकीची माहिती, ‘या’ लीगमध्ये सहभागी नाही होणार सचिन
जन्माने पाकिस्तानी असलेला ऑस्ट्रेलियाचा उस्मान ख्वाजा सचिन-विराटला ‘या’ बाबतीत ठरलाय वरचढ
हेही पाहा-